IMPIMP

एन. ई. एम. एस. प्री-प्रायमरी स्कूलमध्ये शाळा प्रवेशाचा आनंदोत्सव साजरा

by bali123
Deccan Education Society's New English Medium School Pre primary unit The school re opened virtually

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Deccan Education Society) एन. ई.एम.एस. प्री-प्रायमरी स्कूल (New English Medium School Pre primary), शनिवार पेठ येथे १५ जून २०२१ रोजी शाळा (school) प्रवेशाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सध्या कोरोनाच्या साथीमुळे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाहीत. परंतु विद्यार्थ्यांना शाळा (school) व त्यांचे शिक्षक (Teacher) यांना बघता यावे म्हणून शिक्षकांनी मुलांसाठी live कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

शिक्षकांनी शाळा व वर्ग आकर्षक पद्धतीने सजवले होते. शाळेच्या प्रवेशद्वारापासून मुलांना शाळेत आणण्यात आले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी (Headmistress Shilpa Kulkarni) यांनी मुलांचे स्वागत केले, नंतर सरस्वती पूजन करून शाळेची प्रार्थना म्हणण्यात आली. त्यानंतर मुलांचे औक्षण केल्यावर मुलांनी शाळेत प्रवेश (Admission to school) केला. सर्व शिक्षकांनी मुलांना त्यांच्या वर्गात नेऊन स्वतःची ओळख करून दिली. सर्व विद्यार्थी व पालक उत्साहाने या ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित होते. शाळेत जाता येत नसले तरीही अशाप्रकारे मुलांनी शाळा बघण्याचा आनंद घेतला.

Chinese goods in India | चीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या नाहीत चीनी वस्तू

शाळा समिती अध्यक्ष Adv. अशोक पलांडे यांच्या मार्गर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Posts