IMPIMP

Pune News | घर पाडण्याची धमकी दिल्याने एकाची आत्महत्या, भाजप नगरसेवकाविरुद्ध FIR दाखल

by bali123
one commits suicide threatening broken house after tower crime case filed against bjp corporator anand rithe

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – घरावर बसवलेला मोबाईल टॉवर (Mobile tower) पाडल्यानंतर मानहानी सहन न झाल्याने तसेच घरही पाडण्याच्या धमकी दिल्याने त्रस्त झालेल्या दत्तवाडीमधील एकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. या प्रकरणी भाजप नगरसेवकाविरुद्ध (BJP corporator) दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. one commits suicide threatening broken house after tower crime case filed against bjp corporator anand rithe

संजय महादेव सुर्वे (Sanjay Mahadev Surve) (वय 53, रा. महादेव बिल्डिंग, दत्तवाडी) असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा शशांक संजय सुर्वे (Shashank Sanjay Surve) (वय 26) यांनी दत्तवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल 2021 पासून 21 जून 2021 पर्यंत सुरु होता. सुर्वे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपचे नगरसेवक आनंद रमेश रिठे (BJP corporator Anand Rithe) (रा. साई मंदिराजवळ, दत्तवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , facebook page for every update

दत्तवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी येथील प्रभाग क्रमांक 29 मध्ये राहणाऱ्या संजय सुर्वे यांनी आपल्या महादेव बिल्डिंगच्या टेरेसवर मोबाईल कंपनीचा नवीन टॉवर बसविला होता. दरम्यान प्रभाग क्रमांक 30 चे विद्यमान नगरसेवक आनंद रिठे यांनी महापालिकेकडून टॉवर काढून न टाकण्याच्या बदल्यात पैसे मागितले होते. सुर्वे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने नगरसेवक रिठे यांनी महापालिकेत अर्ज करुन 10 जून रोजी त्यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवरील मोबाईल टॉवर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचा फौजफाटा आणून काढून टाकला होता. तसेच टॉवरनंतर त्यांचे राहते घरदेखील पाडून टाकण्याची धमकी देऊन रिठे यांनी सुर्वे यांना मानसिक त्रास देत होते. रिठे यांच्या त्रासाला कंटाळून तसेच घर पाडण्याच्या चिंतेने सुर्वे यांनी सोमवारी त्यांच्या इमारतीमधील सायकल दुरुस्तीच्या दुकानाच्या छताचा दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुर्वे यांना नगरसेवक रिठे यांनी मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे शशांक सुर्वे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Tital : – one commits suicide threatening broken house after tower crime case filed against bjp corporator anand rithe

Related Posts