IMPIMP

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

by omkar
Petrol Diesel Price

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन –वृत्त संस्था – पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price Today)च्या दरवाढीने देशात इतिहास निर्माण केला आहे. देशातील सर्व शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. पेट्रोल 25 दिवसात 6.09 रुपये प्रति लीटरने महागले, तर डिझेल 6.09 रूपयांनी महागले. सध्या सरकारी तेल कंपन्यांनी आजच्या दिवशी दोन्ही इंधनात वाढ केलेली नाही.
काल पेट्रोलच्या किंमतीत 29 पैसे प्रति लीटर तर डिझेलच्या किंमतीत (Diesel Price Today) 30 पैसेपर्यंत वाढ दिसून आली.
महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलने उच्चांक गाठला आहे येथे पेट्रोलचा दर 104.52 रूपये तर डिझेलचा दर 95.12 रूपये आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई 102.58 – 94.70
पुणे 102.34 – 93.01
ठाणे 102.74 – 94.86
अहमदनगर 103.04 – 93.67
औरंगाबाद 102.88 – 93.53
धुळे 102.88 – 93.55
कोल्हापूर 102.79 – 93.47
नाशिक 103.07 – 93.72
रायगड 102.39 – 93.03

या शहरात 100 रुपयांच्या पुढे पोहचला भाव
याशिवाय अनेक शहरे जसे की हैद्राबाद, मुंबई, जयपुर, भोपाळ, श्रीगंगा नगर आणि रीवामध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे गेले आहे.
मध्यप्रदेशच्या अनूपनगरमध्ये पेट्रोल 107.17 रुपये आणि डिझेल 98.29 रु प्रति लीटरच्या ऐतिहासिक किंमतीला मिळत आहे.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर
प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते.
ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते.
या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात.
मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती
तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल.
या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते.
यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल.
एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता

Also Read:

  1. Sambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, राजे म्हणाले –  ‘संभाजी राजेंच्या आंदोलनाला माझा पाठिंबा’ (Video)
  2. anti corruption bureau pune | पुणे महापालिकेतील महिला अधिकारी 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, 30 जून रोजी होणार होत्या निवृत्त
  3. Assembly elections | आगामी लोकसभा अन् विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेनेसोबत लढण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं विधान, म्हणाले…
  4. Chhatrapati Shahu Maharaj | अजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं विधान; म्हणाले…
  5. Horoscope 15 june | 15 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे बदलणार नशीब, खिशात येईल पैसा, इतरांसाठी असा आहे मंगळवार

Related Posts