IMPIMP

स्वत:वर गोळी झाडणाऱ्या भाजप खासदाराच्या मुलाच्या पत्नीचा गौप्यस्फोट; म्हणाली…

by amol
Ayush kishor

लखनौ : उत्तर प्रदेशातील मोहनलालगंज येथील भाजप खासदार कौशल किशोर Kaushal kishor यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. या गोळीबारानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तो रुग्णालयातून फरार झाला. याप्रकरणाची नवी माहिती समोर आली आहे. खासदार किशोर यांचा मुलगा आयुष यांच्या पत्नीने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

माझे आयुषसोबत फोनवर बोलणे झाले होते. त्याची कॉल रेकॉर्डिंगही माझ्याकडे आहे. आयुष हा आर्थिक अडचणीत आहे. त्याचा चंदन गुप्ता नावाच्या व्यापाऱ्यासोबत वादही झाला होता. त्यालाच फसवण्यासाठी आयुष याने कारस्थान रचले आहे. माझा पती दिल्लीतील सरकारी निवासस्थानात लपून बसला आहे. खासदार वडील Kaushal kishor त्यांच्या मुलाला वाचवत आहेत. हे संपूर्ण कारस्थान रचले आहे, असा दावा त्या पत्नीने केला आहे.

आयुषसोबत माझ्या भावाची मैत्री

आयुष हा खासदार Kaushal kishor निवासामध्ये राहत आहे.
कुटुंबियांकडून येत असलेल्या दबावामुळे आयुष मला सोडत आहे. त्याच्याविरोधात साक्ष दिल्यास तो माझी साथ देणार नाही.
आयुष आणि माझा भाऊ आदर्श यांच्यात मैत्री आहे.
या मैत्रीमुळेच आदर्शने आयुषवर गोळी चावलण्यात मदत केली होती, असेही त्या महिलेने सांगितले.

Pandharpur News : अवैध सावकारी प्रकरणी भाजप नेत्याच्या घरावर पोलिसांचा छापा

हूँ दृष्टि हीन ,पर दिशा हीन नहीं मैं.. म्हणत, बिग बी कवितेतुन झाले व्यक्त

भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती खालावली, विमानानं मुंबईत उपचारासाठी दाखल

महापौरांच्या घरातील कुत्रा म्हणून जन्म व्हावा, ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाने व्यक्त केली आपली इच्छा

Related Posts