IMPIMP

Chandrashekhar Bawankule : ‘एक मंत्री प्रचारात तर एक मंत्री खुर्ची वाचवण्यात व्यस्त, तीन मंत्र्यांनी नागपूरला वाऱ्यावर सोडलं’

by bali123
all three minister left nagpur winds

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून, राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये भीषण परिस्थिती असताना जिल्ह्यातील तीन मंत्र्यांपैकी एकही मंत्री minister नागपुरात फिरकायला तयार नाही. तीन मंत्री असताना नागपूरला वाऱ्यावर सोडले, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते शुक्रवार पत्रकार परिषदेत बोलत होते.

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

बावनकुळे म्हणाले, नागपुरात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना तिघांपैकी एकही मंत्री minister नागपुरात नाही. कुणी पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहे. तर कुणी बैठका घेत आहे. राज्यातील इतर सर्व मंत्री त्यांच्या जिल्ह्यांकडे लक्ष देत असताना नागपुरातील मंत्र्यांचे मात्र स्वत: च्या जिल्ह्याकडे लक्ष नाही. असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि कुटूंबीयांच्या नावे संपत्ती किती? जाणून घ्या

नागपुरात कोरोनामुळे हाहाकार माजला असताना नागपूरचे पालकमंत्री तामिळनाडूत प्रचारात व्यस्त आहेत. तर गृहमंत्री स्वत:ची खुर्ची वाचवण्यात व्यस्त आहेत. मेडिकल, मेयोसह सरकारी रुग्णालयातील व्यवस्था ढासळली आहे. आगोदरच्या लाटेचा अनुभव असताना देखील वेळेवर उपाययोजना केल्या जात नाहीत. आता परिस्थिती खराब झाल्यानंतर नियोजनाचा देखावा करण्यात येत असल्याचा आरोप, बानवकुळे यांनी केला आहे.

Also Read : 

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

जितेंद्र आव्हाडांचं ‘प्रत्युत्तर’, म्हणाले – ‘फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं’

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

Related Posts