IMPIMP

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना कसे मिळाले सचिन वाझेकडून 4.7 कोटी?, न्यायालयात झाला खुलासा

by bali123
Sachin Waze | anil deshmukh money laundering case sachin wazela declared amnesty witness ready to give all information to cbi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शंभर कोटींच्या कथित वसुली प्रकरणात अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत भर पडताना पहायला मिळित आहे. मुंबईच्या विशेष कोर्टाने (Mumbai Special Court) प्रशम दर्शनी अनिल देशमुख यांना सचिन वाझे (sachin waze) आणि त्यांचा सहाय्यक कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांच्याकडून 4.7 कोटी रुपये मिळाल्याचे दिसून येत असल्याचे म्हटलं आहे. सध्या ईडीकडून (ED) अनिल देशमुखांविरोधात (Anil Deshmukh) चौकशी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) आणि सचिन वाझे प्रकरणी आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आले आहे.

ईडीने या महिन्याच्या सुरुवातीला सचिन वाझे, अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पालांडे (Sanjeev Palande), खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांच्यासह 11 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष कोर्टाचे न्यायाधीश एम.जी. देशपांडे (Judge M.G. Deshpande) यांनी आरोपपत्राचा आढावा घेतला त्यानंतर शनिवारी याविषयी टीप्पणी दिली. कोर्टाने त्यांच्या आदेशात म्हटलं की, साक्षीदार आणि आरोप याबाबत काळजीपूर्वक अभ्यास केला असता प्रथम दर्शनी पैशाच्या व्यवहार झाल्याचे दिसून येते. अनिल देशमुख यांना सचिन वाझे आणि कुंदन शिंदे यांच्याकडून 4.7 कोटी रुपये मिळाले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.

 

हवालाच्या माध्यमातून पैसे वळवले

कोर्टाने म्हटले की, अनिल देशमुख यांनी ही रक्कम ऋषिकेश देशमुख (Rishikesh Deshmukh) यांच्या सांगण्यावरुन हवालाच्या माध्यमातून सुरेंद्र जैन (Surendra Jain) आणि वीरेंद्र जैन (Virendra Jain) यांना पाठवली. त्यानंतर कंपनीच्या माध्यमातून ही रक्कम साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर जमा केली जी केवळ कागदावर राहिली. ही अनिल देशमुख यांची संस्था आहे. आरोपीविरोधात मनी लॉन्ड्रिंग अधिनियम कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी हा पुरेसा पुरवा आहे. ऋषिकेश देशमुख हा अनिल देशमुख यांचा मुलगा आहे.

 

पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला

सचिन वाझेने फेब्रुवारीत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली होती.
त्यानंतर मार्चमध्ये अटक करण्यात आली.
सध्या सचिन वाझेची ईडीकडून चौकशी करीत आहे.
कोर्टाने सर्व आरोपींना समन्स जारी केला आहे. पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला होणार आहे.

Web Titel :- Anil Deshmukh | prima facie it seems anil deshmukh got rs 4 crore 70 lakh sachin waze court

Chinkara Deer Killed In Pune | वन राज्यमंत्री भरणेंच्या इंदापुर तालुक्यात गोळ्या झाडून चिंकारा हरणांची शिकार?, पुणे जिल्ह्यात खळबळ

Gold Price | सोनं मिळतंय 11000 रुपयांनी ‘स्वस्त’, पुन्हा कमाईची संधी; जाणून घ्या 2021 अखेरपर्यंत किती होणार दर

7th pay commission | राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठा दिलासा, जाणून घ्या 

Related Posts