IMPIMP

Anna Hazare | अण्णा हजारेंनी ST कामगारांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले…

by nagesh
Anna Hazare | anna hazare advised the agitating st workers in nagar district

अहमदनगर / राळेगणसिद्धी : सरकारसत्ता ऑनलाइन Anna Hazare | मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांचा संप (ST workers strike) सुरू आहे. एसटी महामंडळाचा सरकारी सेवेत समावेश करावा या मागणीसाठी एसटी कामगारांचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभुमीवर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून जनमताचा रेटा तयार करावा. तसे केल्यास सरकार घाबरून तुमच्या मागण्या मान्य करेल, असं आवाहन त्यांनी एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाशी बोलताना केले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

त्यावेळी बोलताना अण्णा हजारे (Anna Hazare) म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत चर्चा करीन. मागील 17 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अहिंसेच्या मार्गाने सुरू ठेवा. आंदोलनादरम्यान कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे आपणाकडून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी आंदोलकांनी घेतली पाहिजे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पारनेर येथील एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाने अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिष्टमंडळाने त्यांच्यासमोर अनेक प्रश्‍न मांडले आहेत.

 

पुढे अण्णा हजारे म्हणाले, आंदोलनकर्ते व सरकार वेगळे नाहीत. त्यामुळे दोघांनाही एकमेकांचा विचार करायला पाहिजे. 38 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून देखील सरकारला जाग येत नसेल, तर लाखो लोकांनी एकाच वेळी बाहेर पडायला पाहिजे, तरच सरकारचे तोंड उघडेल व आपल्या मागण्या मान्य होतील. असं त्यांनी म्हटलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Anna Hazare | anna hazare advised the agitating st workers in nagar district

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | ‘अनिल परब तुम्ही 6 व्या मजल्यावरुन उतरला नाहीत, पण महाराष्ट्राच्या मनातून उतरलात’ – मनसेचा हल्लाबोल

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम. जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश सोमजीची येरवडा कारागृहात रवानगी; पत्नी डिंपल सोमजीच्या जामीनावर सोमवारी सुनावणी

LPG Cylinder | जर गॅस सिलेंडरने घडली असेल दुर्घटना तर मिळेल 50 लाख रुपयांची भरपाई, जाणून घ्या कशी?

 

Related Posts