IMPIMP

जेव्हा स्टेजवर डान्स करू लागले भाजप आणि काँग्रेसचे टॉपचे 2 नेते, पाहा व्हिडीओ

by pranjalishirish
assam elections 2021 bjp himanta biswa sarma congress gaurav gogoi broke into a dance in rally

सरकारसत्ता ऑनलाइन : – आसाममध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. अश्याच एका प्रचार अभियाना दरम्यान भाजपचे BJP हेमंत बिस्वा सरमा आणि कॉंग्रेसचे गौरव गोगोई वेगवेगळ्या कार्यक्रमात आपल्या प्रचंड जनसमुदायासह थिरकताना दिसले. दरम्यान, आसाम विधानसभा निवडणुकांसाठी तीन चरणांमध्ये निवडणुका होणार आहेत, याआधी 27 मार्च रोजी आधीच्या पहिल्या चरणात मतदान झाले.

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

यादरम्यान एक चुनावी रॅलीच्या वेळी आसाम भाजपाचे BJP नेते हेमंत बिस्वास सरमाने व्यासपीठावर जोरदार ठूमके लावताना दिसले. सरमा राज्याचे आरोग्यमंत्री आणि जलुकबरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आहेत. सरमा यांनी ट्विट केले की, रॅलीतील गर्दी पाहून त्यांना नक्कीच धक्का बसला. सरमा 2001 पासून जलुकबरी जागा जिंकत आहेत. सरमा यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये ते नाचताना दिसत आहे आणि यावेळी ते गर्दीलाही स्वतःला फॉलो करायला सांगत आहेत. यानंतर तेथे उपस्थित लोक टाळ्या वाजवतात आणि भाजप नेत्याच्या सुरात सुरू मिसळतात आणि हा राजकीय कार्यक्रम मैफिलीत बदलून जातो. हेमंत बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की, ‘पानेरी येथे मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदाय पाहून मला धक्का बसला. जनतेच्या या प्रेमाबद्दल आणि त्यांच्या समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

दुसरीकडे, दोन वेळा खासदार असलेले आणि कॉंग्रेसचे लोकसभेतील उपनेते असलेले गौरव गोगोई यांनीही त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते देखील गर्दीसोबच नाचताना दिसत आहे. एका व्हिडीओ ट्विटमध्ये गोगोई पारंपारिक नृत्य करताना हात वर करतात आणि त्यानंतर तिथे उपस्थित लोक त्यांना फॉलो करतात. गोगोई यांनी ट्वीट केले की, “नालबारीमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान इथले वातावरण कोणत्याही उत्सवापेक्षा जास्त होते आणि मला काही करता आले नाही, परंतु आसामबद्दलच्या कॉंग्रेसच्या दृष्टीकोनातून आशा, आनंद आणि आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या उत्साही जनतेबरोबर मी नाचलो.

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

दरम्यान, आसाममध्ये 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल या तीन टप्प्यात मतदान होणार आहे, तर मतमोजणी 2 मे रोजी होईल. पहिल्या टप्प्यात 27 मार्च रोजी 47 जागांवर मतदान झाले . आता दुसर्‍या टप्प्यात 39 जागांवर आणि तिसर्‍या टप्प्यातील 40 जागांवर मतदान होणार आहे.

Also Read

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

‘त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’

‘होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, राज्यात सरकार उद्धव ठकारेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?’

Related Posts