IMPIMP

राज्य सरकारमधील आणखी एक दिग्गज मंत्री अडचणीत ! पोलिसात तक्रार दाखल

by pranjalishirish
big news : bjp leader lodges police complaint aginst energy minister nitin raut in police station mumbai

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – शिवसेनेचे नेते माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) पूजा चव्हाण प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) अडचणीत आले, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सचिन वाझे प्रकरणी (Sachin Vaze Case) अडचणीत आले. असं असतानाच आता राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) अडचणीत आले आहेत. भाजपचे माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक (Vishwas Pathak) यांनी राऊत यांच्या विरोधात मुंबईत निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पाठक यांचा नेमका आरोप काय ?

विश्वास पाठक यांनी असा आरोप केला आहे की, ऊर्जा मंत्री नितीन राऊत Nitin Raut यांनी बेकायदेशीरपणे सरकारचं चार्टर्ड विमान वापरलं. इतकंच नाही तर हे विमान वापरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची रित्सर परवानगी घ्यावी लागते, मात्र अशी कोणतीही परवानगी राऊत यांनी घेतली नाही असा आरोप पाठक यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.

‘राज्यापुढं आर्थिक अडचण होती, राऊत यांनी केलेला सर्व प्रवास खासगी’

पाठक यांनी तक्रारीत असंही म्हटलं आहे की, मागील वर्षी कोरोनाच्या काळात राज्यापुढं आर्थिक अडचण असतानाही जुलै महिन्यात राऊत यांनी दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, नागपूर, मुंबई असा प्रवास चार्टर्ड विमानानं केला होता. हा सगळा प्रवास खासगी होता. यात सरकारी कामाचा कोणताही सहभाग नव्हता. इतकंच नाही तर राऊत यांनी सरकारी कंपन्यांवर दबाव टाकत ही बिलं भरायला लावली आहेत असा आरोपही पाठक यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराला बगल देत राऊत यांनी परस्पर विमानाचा वापर केला’

मुळात या सगळ्या प्ररकरणात मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराला बगल देत राऊत यांनी परस्पर विमानाचा वापर केला आहे. तसंच बेकायदेशीरपणे सरकारी कंपन्यांना आपली बिलं भरायला लावली आहेत. त्यामुळं त्यांच्या विरोधात आयपीसी मधील कलम 406, 409 अंतर्गत कारवाई करावी अशी मागणीही पाठक यांनी केली आहे.

‘राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी, अन्यथा…’

राऊत Nitin Raut  यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करत त्यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी अशी मागणी पाठक यांनी केली आहे. तसं झालं नाही तर आपण मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करून न्यायालयीन लढाई सुरूच ठेवू असा इशाराही पाठक यांनी दिला आहे.

‘सरकारी पैशांचा अपव्यय करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई होणार का ?’

पाठक असंही म्हणतात की, एकीकडे वीज बिल न भरल्यानं शेतकरी आणि सर्वसामान्यांची वीज कापली जात आहे. परंतु सरकारी पैशांचा अपव्यय करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई होणार का ? असा सवालही त्यांनी केला आहे.

Also Read : 

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

Related Posts