IMPIMP

खुद्द भाजपचे चंद्रकांत पाटीलच म्हणतात, ‘अजित पवार हे कार्यक्षम मंत्री’

by Team Deccan Express
bjp chandrakant patil reaction on ajit pawar and thackeray government

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी अजित पवार हे कार्यक्षम मंत्री आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून ते हजर असतात, असे म्हटले आहे.

राज्यात कडक निर्बंध असतानाही गोकूळ निवडणूक प्रचारासाठी गर्दी; राजू शेट्टी म्हणतात…

कोरोना परिस्थितीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील chandrakant patil यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘अजित पवार हे कार्यक्षम मंत्री आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून ते हजर असतात. अनेक मंत्र्यांचे फोन 11 वाजेपर्यंत बंद असतात. लोकशाहीचे हे सौंदर्य आहे की कोणी काही बोलू शकते. त्या दिवशी अजित पवार यांचा फोन 24 तास बंद होता. अजित पवार यांनी एकतर पुण्यातून राज्य चालवावे किंवा पुण्यासाठी दुसरा पालकमंत्री नेमावा’.

… म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही, राज ठाकरेंचा सरकारला सल्ला

दरम्यान, चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी अजित पवार ‘आऊट ऑफ नेटवर्क’ आहेत, असा आरोप केला होता. मात्र, त्यांच्या या आरोपाला अजित पवार यांनीही चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता यावर बोलताना पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर शरसंधान साधले.

काय म्हणाले होते अजित पवार?
न्यूज चॅनेलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलीकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts