IMPIMP

महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण झालंय स्वस्त; प्रविण दरेकरांची टीका

by Team Deccan Express
bjp pravin darekar slams thackeray government over virar hospital fire

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – विरारमधील एका रुग्णालयात कोविड सेंटरला भीषण आग लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर pravin darekar यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ‘सुसाईट डेस्टिनेशन’ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय !’, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्येतही मोठी वाढ होत आहे. तर दुसरीकडे अनेक रुग्णालयांमध्ये सातत्याने आगीच्या घटना घडत आहे. आज झालेल्या आगीच्या दुर्घटनेत 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यावर प्रविण दरेकर pravin darekar यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. दरेकर यांनी ट्विट करून म्हटले की, ‘महाराष्ट्रातील रुग्णालय आग प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे. भंडारा, भांडूप, नागपूर आणि आता विरार कोविड रुग्णालयांना आगी लागल्या, नाशिकला ऑक्सिजन गळती झाली. कोरोनापेक्षा ‘सरकारी मुर्दाडपणामुळे’ अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला. विरार येथील विजय वल्लभ कोविड केअर रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त अतिदक्षता विभागाची तातडीने पाहणी केली. अशा दुर्दैवी घटना यापुढे घडू नयेत, याची आरोग्य विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे’.

तसेच राज्य सरकार आता तरी जागे व्हा!! नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाच विरारमध्ये व्यवस्थेतील निष्काळजीपणा दिसून आला. याला संपूर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार ‘जबाबदार’ आहे. ‘सुसाईट डेस्टिनेशन’ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय ! मृतांना श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts