IMPIMP

बोलघेवडे… रोज सकाळी उठून कांगावा करणं बंद करा, फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

by Team Deccan Express
Sanjay Raut | devendra fadnavis is handling maharashtra govt says sanjay raut in press conference

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणांवर ताण येत आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. तर केंद्राकडूनही राज्यासाठी आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यात येत आहेत. मात्र, केंद्राकडून राज्याला होणारी मदत ही अपुरी असल्याचं सरकारमधील मंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे. तर एकीकडे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सरकारचा हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच केंद्र सरकार पूर्ण मदत करत आहे त्यामुळे त्यांनी रोज सकाळी उठून कांगावा करणं बंद करावा, असा टोला फडणवीस devendra fadnavis यांनी लगावला आहे.

पुणेकर ‘कोरोना’च्या संकटाचा सामना करत असताना लोकप्रतिनिधी बंगालमध्ये प्रचारात Busy

मुंबईत पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकारने दहा दिवसांसाठी 16 लाखापैकी 4 लाख 35 हजार रेमडेसीवरचे इंजेक्शन महाराष्ट्राला दिले आहेत. सर्वात मोठा कोटा महाराष्ट्राला मिळाला आहे. यामुळे राज्याला दिलसा मिळेल. 1750 मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिला आहे. सतत जे बोलघेवडे लोक केंद्र सरकारवर बोलताना त्यांना इतकचं सांगू इच्छितो की, इतर राज्यापेक्षा दुप्पट दिले आहे हा ऑक्सिजनचा साठा 1100 व्हेंटिलेटर दिले आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

काँग्रेसचा नवाब मलिकांना टोला, म्हणाले – ‘श्रेय घेण्यासाठी घोषणा करणे योग्य नाही’

‘कांगावा’खोरांनी कांगावा करु नये
फडणवीस devendra fadnavis पुढे म्हणाले, आजही हवाई दलाच्या माध्यमातून महाराष्ट्रात इतर गोष्टी पोहोचल्या आहेत. त्यामुळे जे कांगावेखोर आहेत त्यांना माझी विनंती आहे, लोक दु:खात असून केंद्र सरकार मदत करत आहे. केंद्राची राज्याला मदत मिळत असून रोज सकाळी उठून कांगावा करु नये, अशी अप्रत्यक्ष टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर आणि आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर केली आहे.

‘आदित्यजी, ‘आपल्याला झेपतील अन् समजतील अशाच विषयावर ट्विट करा’; भाजपचा टोला

धोरण ठरवलं पाहिजे
पहिल्याच दिवशी पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता असली पाहिजे. 1 तारखेपासून आपल्याला लसीकरणाची पद्धत स्टेटस बदलायला हवी, कारण आता मोठ्या संख्येनं लोक यात सामील होणार आहेत आणि त्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे, गर्दी होण्याची शक्यता आहे, त्याचे धोरण मात्र राज्य सरकारने ठरवले पाहिजे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी ठाकरे सरकारला दिला.

फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्येही प्रत्येक पात्र नागरिकाला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे राज्यांवर त्याचा भार नाही. एखाद्या राज्याला वेगाने लसीकरण करायचे असल्यास बाजारात लस उपलब्ध आहेत. मात्र 100 टक्के भारतीयांकरिता केंद्र सरकारने व्यवस्था निर्माण केली असून लसीकरण होणार आहे. आता वेगवेगळी वक्तव्यं का केली जात आहेत. ट्विट डिलीट का केली जात आहेत याची मला कल्पना नाही, याबाबत मला बोलायचे नाही, असे म्हणत फडणवीस devendra fadnavis यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts