IMPIMP

पुणेकर ‘कोरोना’च्या संकटाचा सामना करत असताना लोकप्रतिनिधी बंगालमध्ये प्रचारात Busy

by Team Deccan Express
BJP | several eknath shindes in trs telangana bjp chief hits out at kcr

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा corona प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. पुणे शहरात देखील कोरोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसताना भाजपचे आमदार मागील पंधरा दिवसांपासून आपल्या मतदारसंघाला वाऱ्यावर सोडून पश्चिम बंगालच्या प्रचारात व्यस्त असल्याचे समोर आले आहे. पुणे कंटोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह माजी सभागृह नेते धीरज काटे यांच्यासह अनेक पदाधिकारी पश्चिम बंगालमध्ये प्रचारात सहभागी झाले आहे. दरम्यान, आमदार सुनील कांबळे हे रविवारी (दि.25) सायंकाळी पुण्यात परतले आहेत.

काँग्रेसचा नवाब मलिकांना टोला, म्हणाले – ‘श्रेय घेण्यासाठी घोषणा करणे योग्य नाही’

देशात कोरोनाची corona दुसरी लाट आली असून दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. यामध्ये पुण्याची परिस्थिती गंभीर आहे. पुण्यात दररोज पाच ते सहा हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. मात्र, रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. रुग्णांना वेळेवर बेड मिळत नसल्याने परिस्थिती आणखीनच चिंताजनक बनली असून पुणेकर हवालदिल झाले आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना ज्या लोकप्रतिनिधींना लोकांनी निवडून दिले त्यांनी आपल्या मतदारसंघाला वाऱ्यावर सोडले. हे लोकप्रतिनिधी सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे आपले प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच गायब असल्याने मदत कोणाकडे मागायची असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

एकीकडे पुण्यात कोरोनाचा corona प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज अनेक रुग्णांचा मृत्यू होत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधींना पश्चिम बंगालची निवडणूक महत्त्वाची वाटत आहे. याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील हे कोरोना काळात आपल्या मतदारसंघामध्ये राहून नागरिकांची मदत करत आहेत. तर आमदार शिरोळे, कांबळे हे मात्र पश्चिम बंगालमध्ये प्रचारात व्यस्त असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. आमदार सुनील कांबळे रविवारी पश्चिम बंगालमधील प्रचार दौरा आटपून सायंकाळी पुण्यात आले आहेत. तसेच नगरसेवक घाटे देखील दोन दिवसांपूर्वी पुण्यात परतले आहेत. मात्र आमदार शिरोळे सध्या पश्चिम बंगालमध्ये आहेत की पुण्यात परतले आहेत हे समजू शकले नाही.

‘आदित्यजी, ‘आपल्याला झेपतील अन् समजतील अशाच विषयावर ट्विट करा’; भाजपचा टोला

पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी गेलो असलो तरी मतदारसंघामधील नागरिकांच्या मदतीसाठी यंत्रणा लावली होती. यामधून 155 जणांना हॉस्पिटलमध्ये बेड, 52 जणांना व्हेंटिलेटर उपलब्ध करुन दिले आहे. याशिवाय कंटोमेंट रुग्णांना मदत केली आहे. रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने मतदारसंघामध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. 100 ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरु केले. तर भवानी पेठेत आणखी एक कोविड सेंटर सुरु होत असल्याची माहिती कंटोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी दिली.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, पुणेकरांनी ज्यांना निवडून दिले ते कोरोनाच्या corona  संकट काळात त्यांना सोडून प्रचारासाठी गेले. या लोकप्रतिनिधींना जनतेपेक्षा निवडणूक महत्त्वाची वाटते हे दुर्दैवी आहे. केंद्राकडून पुणेकरांसाठी जास्तित जास्त रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्याचे प्रयत्न करणे गरजचे असताना ही मंडळी प्रचारात व्यस्त आहेत. हे पुणेकर कधीही विसरणार नसून योग्यवेळी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts