IMPIMP

Narayan Rane | नारायण राणेंना जामीन देताना न्यायालयानं नेमकं काय म्हंटलं?

by nagesh
Narayan Rane | Union minister and bjp leader narayan rane will run in the high court to avoid action on the adhish bungalow

महाड : सरकारसत्ता ऑनलाइन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सर्वत्र भाजप, राणे आणि शिवसेना समर्थक एकमेकांना भिडले. गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. पोलिसांनी राणे यांना रात्री १० च्या सुमारास महाड सत्र न्यायालयात हजार केले. सुमारे सव्वा तासाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. जामीन देताना नारायण राणे (Narayan Rane) यांना वक्तव्याबद्दल न्यायालयाने समन्स दिला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

काय घडले न्यायालयात ?

नारायण राणे यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. पोलिसांनी अटकेसाठी आवश्यक प्रक्रिया पार न पाडल्यानं जामीन मिळाला. दरम्यान, रायगड गुन्हे शाखेत राणेंना ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी हजेरी लावावी लागणार आहे. याशिवाय पुराव्यांशी त्यांनी छेडछाड करू नये, साक्षीदारांवर दबाव टाकू नये, महत्त्वाचे म्हणजे राणेंना आपल्या आवाजाचे नमुने सादर करावे लागणार

 

 सरकारी वकील आणि राणे यांच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद –

नारायण राणेंविरुद्ध महाड, नाशिक, पुणे आणि ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संगमेश्‍वर येथे राणेंना अटक केल्यानंतर त्यांना त्यांच्याच मोटारीने महाड येथे नेण्यात आले. रात्री १० च्या सुमारास त्यांना महाड येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान पोलिसांनी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. सरकारी वकिलांनी मुख्यमंत्र्यांचा राणेंकडून अवमान झाला असून त्यांच्यासारखी मोठ्या पदावरील व्यक्ती अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्ये कशी काय करू शकते? असा सवालही केला.

राणेंच्या विधानामागे कारस्थान असून त्याच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. परंतु, राणेंच्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावला. राणेंना चुकीच्या कलमाखाली पोलिसांनी अटक केली असून अटकेपूर्वी त्यांना कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. राणे यांना झालेली अटक बेकायदा असल्याचे त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले. याशिवाय राणेंची प्रकृती ठीक नसल्याचे ही वकिलांनी न्यायालयास सांगितले होते.

राणे यांच्याविरुद्ध कलम १५३ (ब) आणि ५०५(२) या कलामांनुसार दाखल करण्यात आलेला गुन्हा
चुकीच्या मुद्द्यांवर दाखल केला आहे. जी कलमे लावण्यात आली आहेत, त्यानुसार जास्तीत जास्त
सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अशा प्रकरणामध्ये जामीन देता
येऊ शकतो, असा दावा राणे यांच्या वकिलांनी केला. सुनावाणी सुरु असतानाच पुणे आणि नाशिकचे पोलीस तेथे पोहोचले होते.

 

Web Title : narayan rane union minister granted bail after arrest over slap uddhav remark

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! रक्षाबंधनासाठी घरी आलेल्या अल्पवयीन मुलींचा केला विनयभंग

Narayan Rane | जामिनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणेंनी ट्विट करून दोनच शब्दात दिली प्रतिक्रिया

Pune Crime | निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबावर 1.20 कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

 

Related Posts