IMPIMP

CM Eknath Shinde | ‘त्या’ शिवसैनिकाच्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले

by nagesh
CM Eknath Shinde | cm eknath shinde will announce public holiday on dahi handi 19 august

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइनCM Eknath Shinde | शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी मातोश्री (Matoshri) आणि शिवसेना भवन (Shivsena Bhavan) येथे शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी मातोश्री येथे बैठकीसाठी आलेल्या शिवसैनिकाची तब्येत अचानक बिघडली त्या शिवसैनिकाचे निधन (Death) झाले मात्र या शिवसैनिकाच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी मातोश्री वरून कोणीही आले नाही पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे या कुटुंबाच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

 

भगवान काळे (Bhagwan Kale) असे मृत्यू झालेल्या शिवसैनिकाचे नाव आहे काळे हे कसारा (Kasara) येथील रहिवासी असून सहा जुलैला मातोश्री वर बैठकीसाठी ते गेले होते मात्र त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. या घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मिळताच त्यांनी माजी आमदार पांडुरंग बरोरा (Former MLA Pandurang Barora) आणि ठाणे जिल्हा शिवसेना सचिव साईनाथ तारे (Thane District Shivsena Secretary Sainath Tare) यांच्या माध्यमातून काळे कुटुंबियांना आर्थिक मदत पोहचवली. त्याचसोबत फोनवरून या कुटुंबाचे सांत्वन केले. इतकंच नाही तर काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही शिंदे यांनी स्वीकारली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काळे कुटूंबियांच्या सांत्वनासाठी उद्धव ठाकरे यांच्या गटातील एकही नेता पोहोचला नाही. विशेष म्हणजे घटनेच्या दुसऱ्या दिवशी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे कसारा मार्गेच नाशिक दौऱ्यावर गेले होते. परंतु काळे कुटुंबियांसाठी त्यांनी वेळ काढला नाही. मातोश्रीवरून साधा फोनही काळे कुटुंबियांना आला नाही. अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी याची दखल घेतली.

 

शिंदे यांनी माजी आमदार व काही पदाधिकाऱ्यांना काळे यांच्या घरी पाठवले. कुटुंबियांना तीन लाखाची आर्थिक मदत दिली.
तसेच त्यातील 1 लाखाचा चेक शिवसेना नेत्यांनी पीडित कुटुंबाच्या हाती दिला.
तर लहान मुलांच्या शिक्षणासाठी 2 लाखांची आर्थिक मदत केली. शिंदे यांनी फोनवरून या कुटुंबाशी संवाद साधला.
तसेच यापुढे काही लागल्यास कळवावे असे सांगितले.

 

Web Title :-  CM Eknath Shinde | cm eknath shinde helped for the family of shiv sainik who died outside matoshri

 

हे देखील वाचा :

Pune Rain | पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा ! पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

Pune Crime | तिप्पट पैसे फेडूनही जीवे मारण्याची धमकी देणारा कोथरूड परिसरातील सावकार गजाआड

Pune Sinhagad Fort | ’16 जुलैपर्यंत सिंहगड किल्ला पर्यटनासाठी बंद ठेवा’ – वन विभाग

 

Related Posts