IMPIMP

‘सकारात्मक बातम्यांच्या नावाखाली खोटी माहिती अन् प्रचार हे लज्जास्पद’; प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारवर निशाणा

by nagesh
coronavirus prashant kishor criticised pm narendra modi over article guardian daily

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. दुसरीकडे कोरोनाने मृत्यूची आकडेवारीही वाढत आहे. असे असतानाही देशात राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप मेहनत घेत आहेत. संकटसमयी संयमाने काम करत आहे, अशा आशयाचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (prashant kishor) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सकारात्मक बातम्यांच्या नावाखाली खोटी माहिती व प्रचार, हे लज्जास्पद असल्याचे किशोर यांनी म्हटले आहे.

मर्डर केसमध्ये ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमारचे नाव आले समोर, पोलिसांकडून कुस्तीपटूच्या घरावर छापा

एका इंग्रजी वेबसाइटवर पंतप्रधान मोदींच्या कार्याची दखल घेणारा हा लेख झळकला आहे. बहुतांश भाजप नेत्यांनी हा लेख आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावरून किशोर prashant kishor यांनी टीकास्त्र सोडले आहे. एक शोकाकुल देश म्हणून आपण आताच्या घडीला कोरोनाचा सामना करत आहोत. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या शोकांतिकांना आपण सामोरे जात असतानाच खोटी माहिती आणि प्रचार हा सकारात्मक बातम्यांच्या नावाखाली पसरवला जातोय, हे लज्जास्पद आहे. सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला सरकारच्या आंधळ्या प्रचारकांपैकी एक होण्याची गरज नाही, असे किशोर prashant kishor यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेत आहेत. विरोधी पक्षांच्या जाळ्यात अडकू नका. देशाला असे पंतप्रधान लाभलेत जे संकटसमयी शांतपणे काम करत आहेत. कोणतीही प्रतिक्रिया देण्यापासून ते दूर आहेत. कारण आपले लक्ष अन् ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी वापरत असून दुप्पटीने काम करत आहेत. इतराप्रमाणेच त्यांनी देखील क्राय बेबी बनून प्रश्नांचीच चर्चा केली तर उत्तरे कोण शोधणार, अशी विचारणा या लेखातून केली आहे.

Also Read :

भाजपकडून माजी खा. संजय काकडे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही?, शिवसेनेचा ‘सामना’तुन सवाल

Related Posts