IMPIMP

Devendra Fadnavis | नवाब मलिकांनी हायड्रोजन ‘बॉम्ब’ फोडत गंभीर आरोप केल्यानंतर फडणवीसांनी केलं ‘हे’ Tweet

by nagesh
Nawab Malik | NCP Minister nawab malik targets devendra fadnavis on ed raid bjp use sharad pawar ncp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. मलिक यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. नोटबंदीतील आरोपींना फडणवीसांचा आशीर्वाद होता. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना फडणवीसांनी उच्च पदांवर बसवले, असा आरोप देखील मलिकांनी केला. यानंतर फडणवीसांनीही ट्वीटच्या माध्यमातून मलिकांना लक्ष केलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

नवाब मलिकांच्या (Nawab Malik) आरोपानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ‘Thought of the day’ असं कॅप्शन देत एक ट्वीट केलं आहे. दरम्यान, बनावट नोटांच्या प्रकरणातील आरोपी इम्रान आलम शेख हा अल्पसंख्यांक आयोगाचा अध्यक्ष बनवलेल्या हाजी अराफत शेख याचा छोटा भाऊ आहे. हाजी अराफत शेख याला फडणवीसांनी आपल्या पक्षात घेत अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवलं. नागपुरातील मुन्ना यादव याच्यावर हत्येचा आरोप आहे. त्याला फडणवीस यांनी बांधकाम कामगार मंडळाच्या अध्यक्षपदावर बसवलं. हैदर आझम हा बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो. याच्या दुसऱ्या पत्नीवर बनावट कागदपत्रांबाबत मुंबईतील मालाड पोलिसांत गुन्हा दाखल होत असताना फडणवीस यांच्या कार्यालयातून फोन गेला होता असा आरोप मलिकांनी केला.

 

 

दरम्यान, जेव्हा 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली तेव्हा मोदीजींनी सांगितलं की दहशतवाद, काळापैसा संपवण्यासाठी नोटबंदी लागू करत आहे. नोटबंदीनंतर देशाच्या विविध भागात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. मध्य प्रदेश, तमिळनाडूत बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पण 8 ऑक्टोबर 2017 म्हणजेच जवळपास 1 वर्षापर्यंत राज्यात एकही बनावट नोटांचं प्रकरण समोर आलं नाही. 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीत एक छापेमारी झाली यावेळी 8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. असे ते म्हणाले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

मलिक म्हणाले (Nawab Malik) की, मी फडणवीसजी तुम्हाला विचारु इच्छितो की, रियाज भाटी कोण आहे?

29 ऑक्टोबर रोजी सहार एअरपोर्टवर बनावट पासपोर्टसह पकडण्यात आलं.
त्याच्यावर दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
डबल पासपोर्टसह एखाद्या व्यक्तीला पकडलं जाईल आणि 2 दिवसांत सुटला जाईल यामागे कोणता खेळ होता.
रियाज भाटी तुमच्या सोबत सर्वच कार्यक्रमात का दिसत होता.
रियाज भाटी भाजपच्या सर्व कार्यक्रमात कसा दिसत होता.
देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात रियाज भाटी कसा उपस्थित होता.
पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला. असं मलिक यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis tweet after ncp leader nawab malik made serious allegations

 

हे देखील वाचा :

Udayanraje Bhosale | शिवेंद्रराजेंचा विरोध असतानाही उदयनराजेंची बिनविरोध निवड !

Bribe Case | 5 हजाराची लाच घेताना महिला उप अभियंता जाळ्यात

Pune ST Workers Strike | सरकारने एसटी स्थानकात ‘सवत’ आणल्यानं ST कामगारांचा ‘जागरण गोंधळ

Pune Crime | पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक घटना ! प्रेमसंबंधाबाबत पतीला सांगून बदनामी करण्याची धमकी; 30 वर्षीय विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी

 

Related Posts