IMPIMP

Devendra Fadnavis | ‘MPSC ला स्वायत्तता दिलेली आहे, पण स्वायतत्ता म्हणजे स्वैराचार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात

by bali123
devendra fadnavis reaction on swapnil lonakar suicide case

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Devendra Fadnavis | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी (JOB) मिळाला नसल्याने तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे स्वप्नील सुनील लोणकर Swapnil Sunil Lonakar (वय-24 रा. गंगानगर, फुरसुंगी) या विद्यार्थ्याने (Student) गळफास घेऊन आत्महत्या (commit suicide) केली. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) जोरदार निशाणा साधला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

MPSC उत्तीर्ण झालेल्या तरुणांच्या नियुक्त्या रखडल्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्येचं वातावरण आहे. आम्ही MPSC ला स्वायत्तता दिली आहे, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही, अशा शब्दांत त्यांनी पुण्यातील (Pune) तरुणाच्या आत्महत्येवर सरकारला सुनावलं आहे. (Devendra Fadnavis criticizes Thackeray government over MPSC student suicide)

तर मग त्यांना ही निराशा येते

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, मला असं वाटतं कुठतरी एकुणच एमपीएससीची जी कार्यप्रणाली (MPSC operating system) आहे, त्याचं पुनरावलोकन होण्याची आवश्यकता आहे. ज्या प्रकारे त्या ठिकाणी वेळ लागतो, मुलाखती (Interview) होत नाहीत. आज तिथल्या अनेक जागा रिक्त (Vacancy) आहेत. एमपीएससीचे मेंबर्स (MPSC members) देखील आपण भरलेले नाही.

मला असं वाटतं हे योग्य नाही. शेवटी आमची जी ही तरुण मुलं आहेत, अत्यंत अपेक्षेने ही सगळी
मुलं अशाप्रकारच्या परीक्षा (Exam) देतात आणि 2-2 वर्षे मुलाखत झालीच नाही. तर मग त्यांना ही
निराशा (despondence) येते, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra
Fadnavis) यांनी स्वप्नील लोणकरच्या (Swapnil Sunil Lonakar) आत्महत्येवर (commit
suicide) माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.

सरकारने MPSC कारभाराचा आढावा घ्यावा

आम्ही एमपीएससीला (MPSC) स्वायत्तता दिलेली आहे, पण स्वायत्तता (Autonomy) म्हणजे स्वैराचार नाही. त्यामुळे सरकारला देखील आमची विनंती आहे. की एमपीएससीच्या संपूर्ण कारभाराचा पुन्हा आढावा घ्यावात. कशाप्रकारे यामध्ये संपूर्ण परिवर्तन करुन, त्याला अधिक आपल्याला कार्यक्षम करता येईल याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले.

Web Titel : devendra fadnavis reaction on swapnil lonakar suicide case

Related Posts