IMPIMP

राज्यपालांना 12 सदस्यांवर PhD करायची का?; संजय राऊतांचा सवाल

by bali123
Sanjay Raut | shivsena mp sanjay raut on governor bhagatsingh koshyari relieve for post governor

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – महाविकास आघाडीकडून राज्यातील 12 सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. या सर्वांना विधान परिषदेचे सदस्यत्व मिळावे म्हणून नावांची यादी दिली. पण त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. याच मुद्यावरून शिवसेनेकडून टीका केली जात आहे. त्यानंतर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत sanjay rauts यांनी राज्यपाल कोश्यारी यांना खोचक सवाल केला.

शरद पवारांनी UPA चं नेतृत्व करण्यासंबंधी संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 आमदार असतात. या सर्वांची निवड राज्यपालांच्या संमतीने केली जाते. पण या नावांची शिफारस राज्य सरकार करू शकते. मात्र, अंतिम निर्णय हा राज्यपालच घेत असतात. त्यानुसार, ही नावे राज्यपालांकडे गेल्या काही महिन्यांपूर्वी देण्यात आली. पण त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे संजय राऊत sanjay rauts यांच्याकडून याच मुद्यावरून वारंवार टीका केली जात आहे.

जाणून घ्या बीट ज्यूस पिण्याचे फायदे, विसरण्याचा आजार होईल दूर अन् इतरही फायदे

त्यानंतर आता राऊत म्हणाले, ‘राज्यपाल सध्या खूप व्यस्त असतात, त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळ आहे की नाही हे मला माहिती नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून भाजपच्या लोकांचे राजभवनामध्ये येणे-जाणे, खाणे-पिणे सुरु आहे. पण मुख्यमंत्री व कॅबिनेट मंडळाने पाठवलेल्या 12 सदस्यांवर राज्यपाल अभ्यास करत आहेत का? ही नावे पाठवून 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. त्या नावांचे काय झाले? अभ्यास करुन पीएचडी करणार का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

दरम्यान, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्या पदाचा मान राखला पाहिजे. राज्यपालांचा मान विरोधकांनीच ठेवला नाही. त्यामुळे त्यांच्यावर टीका होणारच. राजभवन हा राजकारणाचा अड्डा झाला आहे. तसेच जोपर्यंत राज्यपाल 12 सदस्यांच्या नावाला मंजूरी देत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर टीका करणारच, असेही ते म्हणाले.

Also Read :

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

 

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

West Bengal Election 2021 : PM नरेंद्र मोदींनी ‘त्या’ भाजप कार्यकर्त्याचे पायच धरले !, पहा व्हिडीओ

Related Posts