IMPIMP

भाजप नेत्यानं दिला गंभीर इशारा, म्हणाले – ‘नवाब मलिक यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, अन्यथा…’

by nagesh
Nawab Malik | the more times we defeat bjp price of petrol and diesel will be reduced more says ncp leader nawab malik

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – दोन दिवसांपूर्वी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी केंद्र सरकारने रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर देऊ नये अन्यथा आपला परवाना रद्द करण्याची धमकी दिल्याची खोटी माहिती दिली. केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्याविरोधात अफवा पसरविल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत भाजप मुंबईचे प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आज (सोमवार) दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

नवाब मलिक nawab malik यांनी खोटी माहिती देऊन केंद्र व राज्य सरकारमध्ये नाहक वाद निर्माण करुन राष्ट्रीय एकतेला तडा जाईल असे वक्तव्य केले. एवढेच नाही तर प्रसार माध्यम व समाज माध्यमातून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम केले. यामुळे हजारो लोक भयभीत झाले असून ते महाराष्ट्र सोडून जात आहे. रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यातून कोरोना मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे.

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’

नवाब मलिक nawab malik यांचे हे कृत्य बेकायदेशीर असून महामारी रोग अधिनियम, 1897 नुसार गुन्हा असल्याने नवाब मलिक यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा. अशी मागणी भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी तक्रारीत केली आहे. राज्य सरकारने पुढील 48 तासांत मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही तर उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा भातखळकर यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात रेमडेसिवीरवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

Also Read :

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

Related Posts