IMPIMP

Former MP Raju Shetty | भाजपची राजू शेट्टींवर टीका म्हणाले, ज्यांनी जात काढली त्यांच्याच खांद्यावर शेट्टींना डोक ठेवाव लागतंय…

by bali123
Former MP Raju Shetty | bjp mla atul bhatkhalkar taunts farmer leader raju shetti over his meeting with sharad pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Former MP Raju Shetty | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी (Former MP Raju Shetty) यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आम्हाला वेळ देत नाही. अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यावरून भाजपने (BJP) राजू शेट्टींवर बोचरी टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. राजू शेट्टींनी पवारांची भेट घेऊन केंद्राच्या नवीन कृषी कायद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही. अशी नाराजी व्यक्त केली. त्यावर पवारांनीही शेट्टींना तक्रारीची दखल घेत यामध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन दिलं. यावर भातखळकर यांनी ट्वीट करत ‘काय दिवस आलेत राजू शेट्टींवर, ज्या पवारांनी त्यांची जात काढली त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांना अश्रू ढाळावे लागतायत. नियतीचा सूड म्हणतात तो हाच…,’ असा टोला त्यांनी शेट्टींना लगावला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नगरमधील हाणामारीवरून शिवसेनेवर टीका

भातखळकर यांनी आणखी एक ट्वीट केले असून नगरमधील शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन गटात झालेल्या राड्यावरून सेनेवर निशाणा साधला. अहमदनगर महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) महापौर निवडणूकीच्या वादातून मंगळवारी रात्री शिवसेनेच्या दोन गटात राडा झाला. ही हाणामारी आर्थिक देवाण घेवाणीतून झाल्याचे समोर येत आहे. त्यावरून विश्वासघात करून मिळालेली सत्ता कधीच पचत नाही. जिथं सर्वोच्च नेतेच सत्तेसाठी हपापलेले आहेत, तिथं सामान्य कार्यकर्त्यांची काय कथा, अशा शब्दात भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

Web Title :- Former MP Raju Shetty | bjp mla atul bhatkhalkar taunts farmer leader raju shetti over his meeting with sharad pawar

Related Posts