IMPIMP

गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत, शरद पवारांसोबत ‘वाझें पे चर्चा’

by pranjalishirish
home minister anil deshmukh in delhi at 6 janpath house of sharad pawar, discussion on sachin vaze

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. तसेच याच प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत.

‘रामायण’मधील ‘राम’ अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश

सचिन वाझे यांचे या प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांच्यावर कारवाईसाठी दबाव वाढत होता. त्यानुसार, त्यांना निलंबित करून अटकही करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करत आहे. सचिन वाझे यांच्यावरील कारवाईनंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनाही पदावरून दूर करण्यात आले. पण अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावर कायम ठेवण्यात आले. त्यानंतर आता देशमुख हे शरद पवार Sharad Pawar यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले. सचिन वाझे प्रकरणावर ते शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

खासदार श्रीनिवास पाटील यांची संरक्षणमंत्र्याकडे मागणी, म्हणाले – ‘सैन्यभरतीची वयोमर्यादा त्वरीत वाढवा’

देशमुख चांगले काम करताहेत

पुढील वर्षभरात अनिल देशमुख हे कायम राहणार का, यावर शरद पवार  Sharad Pawar यांनी उत्तर दिले होते. त्याचा संदर्भ घेत देशमुख यांनी म्हटले, की शरद पवार यांचा आदेश आहे, तोपर्यंत मी गृहमंत्री राहणार आहे. तसेच गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख चांगले काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही यापूर्वी राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले.

Also read : 

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

नाराज असलेल्या वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंच्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये परमबीर सिंह, माजी DGP जयस्वाल यांच्यावर आरोप; पोलीस दलात खळबळ, मुख्यमंत्री ठाकरेंना लिहीलं होतं पत्र

Gulabrao Patil : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ‘कोरोना’ पाँझिटिव्ह

रितिकाच्या आत्महत्येवर गीता फोगाट म्हणाली, ‘जिंकणं-हारणं हा तर खेळाडूच्या आयुष्याचा भाग’

IPL 2021 : ‘मुंबई इंडियन्स’ला मोठा फटका, पाकिस्तानमुळं वाढलं टेन्शन ! जाणून घ्या नेमकं प्रक

राष्ट्रवादीने केले CM उद्धव ठाकरेंचे समर्थन, म्हणाले – ‘वाझेंना सेवेत घेण्यासाठी फडणवीसांवर कोणाचाही दबाव नव्हता’

मुंबईत Lockdown होणार की नाही? पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

Related Posts