IMPIMP

भर विधानसभेत आमदार जोर जोरात लागले घोरू, मुख्यमंत्रीही पाहू लागले वळून वळून

by sikandershaikh
mlas-jharkhand-assembly

रांची : वृत्तसंस्थाJharkhand Assembly | विधानसभा अधिवेशन म्हंटल की होणाऱ्या वादळी चर्चा, गोंधळ, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होणारी खडाजंगी हे घडतच असते. कधी कधी ते अधिवेशन भलत्याच कारणाने चर्चेत येते. झारखंडमधील विधानसभा ही एका गमतीदार प्रकारामुळे चर्चेत आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना हा प्रकार घडल्याने सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात
याचीच चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

त्याचे झाले असे की, सध्या झारखंड विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सोमवारी या अधिवेशनात राज्यपालांनी दिलेल्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा सुरू होती. अभिभाषणावर सर्वपक्षीय आमदार आपल्या क्रमानुसार आपले मत मांडत होते. दरम्यान, विधानसभेत बोलण्यासाठी अपक्ष आमदार सरयू राय हे उभे राहिले असताना भाषणादरम्यान, सभागृहातील एका बाजूने जोराजोरात घोरण्याचा आवाज येऊ लागला.या आवाजाने भाषणात व्यत्यय आला. सर्वच उपस्थित आमदार आवाजाच्या दिशेने पाहू लागले.

या प्रकारामुळे आमदारांमध्ये चुळबुळ सुरु होताच नेमका काय प्रकार सुरू आहे हे पाहण्यासाठी पहिल्या बाकावर असलेले मुख्यमंत्री हेमंत सोरेन सुद्धा मागे वळून पाहू लागले. अखेर गाढ झोपलेल्या या आमदारांना उठवण्यात आले. दरम्यान, कोरोनाच्या नियमांची कडक अंलबजावणी सुरु झारखंडमधील अधिवेशनात अनेक आमदार मास्क न घालताच सभागृहात आले होते.यासंदर्भात विचारणा केली असता या आमदार मंडळींकडून वेगवेगळ्या प्रकारे सारवासारव करण्यात आली.

Related Posts