IMPIMP

सरकारला फक्त विकायचं कळतं, नवं बनवायचं नाही’; राहुल गांधींचा टोला

by bali123
modi government wants only to sell, not make new : Rahul Gandhi

नवी दिल्ली : देशातील अनेक सरकारी संस्थांचे खासगीकरण केले जात आहे. त्यावरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी Rahul Gandhi यांनी सरकारला याच मुद्द्यावरून टोला लगावला. ‘सरकारला नवं काही बनवायला येत नाही, पण त्यांना फक्त विकायचं कळतं’, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून काही सरकारी संस्थांचे खासगीकरण करण्यात आले आहे. एअर इंडिया, भारतीय रेल्वे यांसारख्या सरकारी संस्थांसह इतर काही संस्थांच्या खासगीकरणाचा मुद्दा महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच खासगीकरणाच्या पहिल्या यादीमध्ये दोन सरकारी बँकांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. खासगीकरणाच्या या मुद्यावरून राहुल गांधी Rahul Gandhi यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. त्यांनी #IndiaAgainstPrivatisation या हॅशटॅगखाली ट्विट करून म्हटले, की ‘ते जनतेला दुखावून फक्त काही मित्रांना फायदा व्हावा, यासाठी हे करत आहेत. सरकारला नवं काही बनवायला येत नाही, पण त्यांना फक्त विकायचं कळतं.

दरम्यान, राहुल गांधी Rahul Gandhi यांनी यापूर्वी विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर त्यांनी चार विमानतळांच्या शेष भागीदारी विकण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे, या एका वृत्ताचा संदर्भ देत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

Sachin Vaze : स्कॉर्पिओला अंबानींच्या जॅग्वारची नंबर प्लेट ? सचिन वाझेंचे पाय आणखी खोलात ?

PPE किट घातलेली व्यक्ती वाझे की आणखी कुणी ?, NIA वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार, गूढ उलगडणार?

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेते अन् मंत्र्याची बैठक, ‘या’ 3 महत्वाच्या प्रकरणांचा घेणार आढावा

मधुकर पिचड पडणार एकाएकी? राष्ट्रवादी खेळतोय ‘ही’ खेळी

Related Posts