IMPIMP

राणेंच्या नंतर ‘या’ महिला खासदारानं दिलं गृहमंत्री अमित शाहांना पत्र, लिहीलं – ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’

by bali123
Uddhav Thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा navneet rana यांच्याकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहना पत्र लिहिले आहे. नवनीत राणा navneet rana यांनी आपल्या पत्रात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा उल्लेख केला आहे.

नवनीत राणा यांनी काय लिहिले आहे पत्रात
मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. यानंतर कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात आढळून आला. या सगळ्या गोष्टीचा घटनाक्रम नवनीत राणा यांनी आपल्या पत्रात केला आहे. ‘अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. ही कार मनसुख हिरेन यांची होती. ही कार चोरीला गेल्याची तक्रारही त्यांनी पोलीस ठाण्यात केली होती. तीच कार अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्यासह सापडली होती,’ असे नवनीत राणा यांनी आपल्या पत्रात म्हणले आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत हिरेन यांची चौकशी करण्यात आली होती. ते चौकशीला सहकार्यसुद्धा करत होते. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात येत होती. त्याबद्दल हिरेन यांनी ठाकरे सरकारकडे तक्रारसुद्धा केली होती. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणीसुद्धा केली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. असा संपूर्ण घटनाक्रम नवनीत राणा यांनी आपल्या पत्रात नमूद केला आहे.

राज्यात सगळेच असुरक्षित; राष्ट्रपती राजवट लागू करा
मुकेश अंबानी हे देशातील खूप मोठे उद्योगपती आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे देशातील हजारो तरुणांना रोजगार मिळत आहे. जर एवढ्या मोठ्या उद्योगपतीला धमकी मिळत असेल तर उद्योगपतींसह सामान्य लोकांचं रक्षण करण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे या घटनेचा तपास एनआयएकडे द्यावा आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

राज्याचे गृहमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त बदलणार?, जयंत पाटील म्हणाले…

शरद पवार अन् मुख्यमंत्र्यांचं ठरलं ! राज्याला मिळणार नवा गृहमंत्री ? अजित पवार यांच्यासह ‘या’ नावाची जोरदार चर्चा

पवार अन् मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीनंतर मंत्री मंडळात फेर बदलाचे ‘संकेत’; गृहमंत्रीपदी नवीन मंत्र्याची नियुक्ती केली जाण्याची शक्यता

PPE किट घातलेली व्यक्ती वाझे की आणखी कुणी ?, NIA वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार, गूढ उलगडणार?

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेते अन् मंत्र्याची बैठक, ‘या’ 3 महत्वाच्या प्रकरणांचा घेणार आढावा

Related Posts