IMPIMP

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

by pranjalishirish
mp navneet rana unmasked dance goes viral

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरु असताना होळी साध्या पद्धतीने घरी साजरी करा, असं आवाहन सरकारने केले आहे. खासकरुन राजकीय नेत्यांनी धुलवडीच्या कार्यक्रमांना न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा Navneet Rana  यांनी मेळघाटातील आदिवासींसोबत होळीचा मनसोक्त आनंद लुटला. मेळघाटातील आदिवासी महिलांसोबत कोरकू हे आदिवासी नृत्य देखील त्यांनी केले. मात्र, नृत्य करत असताना त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे खासदांना वेगळा नियम आणि सर्वसामान्यांना वेगळा नियम का ? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

होळीचा सण राज्यात साजरा होत असताना या सणावर कोरोनाचे संकट आहे. असे असले तरी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा Navneet Rana व त्यांचे पती आमदार रवी राणा हे आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पोहचले होते. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने राज्य सरकारकडून वारंवार मास्क घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे.मात्र, नवनीत राणा यांनीच कोरोनाच्या नियमांना पायदुळी तुडवल्याचे पहायला मिळत आहे.

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

होळी हा मेळघाटच्या आदिवासी बंधवांचा सर्वात मोठा सण असल्याने खासदार नवनीत राणा Navneet Rana  तसेच आमदार रवी राणा मेळघाटात आले होते. विशेष म्हणजे 11 वर्षापासून होळीचा सण मेळघाटातच साजरा करण्याची त्यांची परंपरा आहे. मेळघाटातील आदिवासी समुदायातील नागरिकांसोबत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी होलिकोत्सव साजरा केला. यावेळी नवनीत राणा यांनी आदिवासींचे प्रसिद्ध कोरकू नृत्य केले. परंतु नृत्य करताना राणा यांना मास्क घालण्याचा विसर पडला. दुर्गम भाग असलेल्या मेळघाटातील काही जण मास्क घालून होते. मात्र लोकप्रतिनिधींनाच मास्कचा विसर पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Also Read

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

‘त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’

‘होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, राज्यात सरकार उद्धव ठकारेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?’

Related Posts