IMPIMP

Mumbai High Court । ‘तपास केवळ अनिल देशमुखांपर्यंतच मर्यादित ठेवू नका’ – मुंबई हाय कोर्ट

by bali123
 Anil Deshmukh | supreme court on anil deshmukh bail application plea pending in supreme court money laundering case

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Mumbai High Court । राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर टाकलेल्या लेटरबॉम्बवरून भ्रष्टाचार प्रकरणावरून त्यांची चौकशी सुरु आहे. तर, त्यांच्याशी संबंधित असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी केवळ देशमुख यांच्याच भूमिकेचा तपास करू नका, तर त्यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांचा तपास करा, याबाबत सूचना मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) दिल्या आहेत. तसेच, पुढील सुनावणी दरम्यान CBI ला तपास रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. mumbai high court says dont limit investigation anil deshmukh, cbi active now

काय म्हणाले उच्च न्यायालय ?

मुंबई उच्च न्यायालयं (Mumbai High Court) म्हणाले की, ‘एप्रिलपासून आतापर्यंत या प्रकरणी किती तपास करण्यात आला ? असा सवाल उपस्थित केला. तपास कुठपर्यंत आला आहे. न्यायमुर्ती. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने आज सुनावणी घेण्यात आली. तसेच, ‘तपास कुठवर आला आहे? सीलबंद तपास रिपोर्ट सादर करा. आम्ही तो वाचू आणि पुन्हा देऊ असं देखील उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर CBI ने 24 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. कोर्टाच्या निर्देशावरून अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केलीय. आणि त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ACB) व गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल देशमुख यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. तपास सुरू असताना गुन्हा रद्द करता येईल का? असा सवाल कोर्टानं अनिल देशमुख यांचे वकील अमित देसाई यांना केला. तर हाय कोर्टाने आदेशावरून प्राथमिक चौकशी केली आहे. तसेच, गुन्हा नोंदवण्यात आला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुढं न्यायालयानं म्हटलं आहे की, ‘ यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांच्या भूमिकेचा तपास करण्याचे CBI चे कर्तव्य आहे. फक्त याचिकाकर्त्यांच्याच (अनिल देशमुख) भूमिकेचा तपास करू नका.
त्यामध्ये सध्या बरखास्त केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना पुन्हा सेवेत घेणाऱ्या समिती सदस्यांचा देखील समावेश आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
‘ही प्राथमिक चौकशी नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढविण्यासाठी करण्यात यावी.
म्हणून हा तपास केवळ याचिकाकर्त्यां पुरताच मर्यादित ठेवू नका.
जे कोणी यात सहभागी आहेत, त्यांचा देखील तपास करा, असं म्हणत कोर्टाने FIR मधील ‘अज्ञात’ आरोपी कोण आहेत ? अशी विचारणा CBI कडे केलीय.

या दरम्यान, ‘सामान्यतः अज्ञात आरोपी हे चोरी अथवा दरोड्याचा प्रकरणांत असतात. या प्रकरणी तुम्ही प्राथमिक चौकशी केलीय.
असं कोर्टानं म्हटलं आहे. त्यावर CBI तर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमन लेखी (Additional Solicitor General Aman lekhi) यांनी याबाबत पुढील सुनावणीत माहिती देऊ,
असं मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं आहे.
दरम्यान या याचिकेवर 7 जुलैपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.

Web Title : mumbai high court says dont limit investigation anil deshmukh, cbi active now

Related Posts