IMPIMP

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

by pranjalishirish
nana patole slams pm modi over narendra modi bangladesh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बांग्लादेशाच्या दौ-यावर आहेत. बांगलादेशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रित केले आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, बांगलादेशचा स्वातंत्र्यलढा माझ्यासाठी पहिले आंदोलन होते. त्यावेळी मला अटकही झाली होती, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  Nana Patole यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदीजी अजून किती फेकणार? हद्द झाली राव असे म्हणत निशाणा साधला आहे.

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली चळवळ’

नाना पटोले Nana Patole  यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. अजून किती फेकणार मोदीजी, आता हद्द झाली राव. शेतकरी आंदोलनावर एक शब्दही तुमच्या तोंडून निघाला नाही आणि स्वातंत्र्याबद्दल बोलण्यासाठी तुम्ही बांगलादेशला जाता. तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाला होता. आता तुम्ही कोण झालात ढोंगीजीवी असा जोरदार हल्लाबोल पटोले यांनी केला आहे. बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. त्यावेळी मी 20 ते 22 वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होते, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. बांगलादेश स्वातंत्र्याला 50 वर्ष झाल्यानिमित्त मला निमंत्रण दिले आहे. या गौरवशाली सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. यावर पटोले यांनी निशाणा साधला आहे.

Also Read

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

जितेंद्र आव्हाडांचं ‘प्रत्युत्तर’, म्हणाले – ‘फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं’

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

 

Related Posts