IMPIMP

UIDAI | आधार कार्ड धारकांना नाही मिळणार ‘या’ दोन सुविधांचा लाभ, जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम

by nagesh
Aadhaar Card Updates | you will not have to go to aadhar center for updates like aadhar card phone number and biometric at home

नवी दिल्ली : वृत्तसंस्था UIDAI | भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) आधारशी संबंधीत सेवा देणारी अथॉरिटी आहे. यूआयडीएआयने आधारशी संबंधीत दोन विशेष सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. या सेवा कोणत्या आणि आता त्यांना कोणता पर्याय आहे ते जाणून घेवूयात.

1. अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर

यूआयडीएआयने अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरद्वारे आधार अपडेट करण्याची सुविधा पुढील आदेशापर्यंत बंद केली आहे. यासाठी तुम्ही अपडेशनसाठी इतर पद्धत वापरू शकता. इतर व्हॅलिड अ‍ॅड्रेस प्रूफच्या यादीपैकी – (https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf) कोणत्याही एका अ‍ॅड्रेस प्रूफद्वारे आपला अ‍ॅड्रेस अपडेट करू शकता. अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर सेवा बंद केल्याने याचा थेट परिणाम भाडेकरू, कामानिमित्त बाहेर गावी राहणार्‍यांवर होत आहे.

2. रिप्रिंटची सुविधा

आता आधार रिप्रिंटचा फॉर्मेटसुद्धा बदलला आहे. जुने मोठे कार्ड बंद केले आहे. यूआयडीएआय आता पॉलिविनायल क्लोराईड (PVC) आधार कार्ड
जारी करते. हे आकर्षक आणि एटीएमकार्डसारखे छोटे आहे. हे खराब होत नाही. सहज खिशात ठेवू शकता. हे घरपोच मागवण्यासाठी 50 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

ही आहे पीव्हीसी कार्ड मागवण्याची पूर्ण प्रक्रिया

1 सर्वप्रथम युआयडीएआयची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in ओपन करा.

2 त्यानंतर माय आधार सेक्शनमध्ये ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा.

3 यावर क्लिक करताच तुम्हाला 12 अंकांचा आधार क्रमांक किंवा 16 आकडी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकांचा ईआयडी नोंदवावा लागेल. या तीनपैकी एक टाकावा लागेल.

4 आधार नंबर टाकल्यानंतर खाली सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा कोड टाका.

5 यानंतर खाली सेंड ओटीपीवर क्लि करा. ज्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.

6 ओटीपी टाकल्यानंतर सबमिट बटन क्लिक करा.

7 यानंतर स्क्रीनवर पीव्हीसी कार्डची प्रीव्ह्यू कॉपी येईल, ज्यामध्ये डिटेल्स असतील.

8 शेवटी पेमेंट ऑपशन येईल. त्यावर क्लिक करून अनेक डिजिटल माध्यमाने 50 रुपये भरू शकता.

9 15 दिवसांच्या आत स्पीड पोस्टने कार्ड तुमच्या घरी पोहचेल.

 

Web Title :uidai discontinues two aadhaar card related services address validation letter and reprint service

 

हे देखील वाचा :

MoPNG e-Seva | जर गॅस एजन्सी तुमच्याकडून घेत असेल भाडे वसूलीच्या नावाखाली जास्त पैसे, तर तात्काळ ‘या’ पध्दतीनं करा तक्रार, जाणून घ्या

Pune Crime | पुणे पोलिसांकडून RTI कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला आश्रय देणार्‍या पुण्यातील वकीलाला अटक

Kabul Airport | काबूल विमानतळाबाहेर 2 स्फोट; 70 जणांचा मृत्यू

 

Related Posts