IMPIMP

‘परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले याची माहिती आमच्याकडे, सत्य सर्वांसमोर येईल

by pranjalishirish
ncp leader nawab malik questions parambir singhs intention

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले गंभीर आरोप हे सुनियोजित कटकारस्थान आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. परमबीर सिंह हे दिल्लीला गेल्यानंतर कोणा-कोणाला भेटले याची माहिती आमच्याकडे असून लवकरच सत्य सर्वांसमोर येईल, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक Nawab Malik  यांनी केले आहे. यावेळी त्यांनी राजीनाम्यावर भाष्य करताना अनिल देशमुख यांचा सध्यातरी राजीनामा घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले.

परमबीर सिंह प्रकरण : शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीला ज्युलिओ रिबेरोंनी देले ‘हे’ उत्तर

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी लावून धरली. परमबीर सिंह यांच्या आरोपामुळे ठाकरे सरकार समोर अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचे स्पष्ट केले. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

एका वृत्तसंस्थेशी बोलताना नवाब मलिक  Nawab Malik म्हणाले, परमबीर सिंह यांनी बदली झाल्यावर मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहिली आहे. 17 मार्चला आपली बदली होणार आहे, हे माहित झाल्यानंतर त्यांनी 16 मार्चला एका पोलीस अधिकाऱ्यासोबत व्हॉट्सॲप चॅट केले. त्या अधिकाऱ्याला काही प्रश्न विचारुन पुरावा तयार केला. त्या चॅटनुसार गृहमंत्री अनिल देशमुख हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सचिन वाझे यांना भेटले असा उल्लेख करण्यात आला आहे. याच दरम्यान, अनिल देशमुख हे विदर्भाच्या दौऱ्यावर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ते 15 दिवस रुग्णालयात होते. 27 फेब्रुवारीपर्यंत ते क्वारंटाईन होते. 27 फेब्रुवारीला त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. असे असताना पुरावे तयार करुन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही मलिक यांनी म्हटले आहे.

Also Read : 

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

‘तलाश नए रास्तों की है…’ खा. संजय राऊतांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील

Related Posts