IMPIMP

MLA Ashutosh Kale | शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी NCP चे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती

by nagesh
NCP MLA Ashutosh Kale appointed as President of Shirdi Sansthan

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन – MLA Ashutosh Kale | राज्य शासनाने शिर्डी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची घोषणा केली असून अध्यक्षपदी कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे (shivsena) जगदीश हरिश्चंद्र सावंत Jagdish Harishchandra Sawant (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

विश्वस्त मंडळांच्या 17 सदस्यांपैकी 11 जणांची निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे
(MLA Ashutosh Kale) वर्चस्व राहिले आहे. त्यात राष्ट्रवादीचे 5, काँग्रेसचे 4 आणि शिवसेनेच्या 2 नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उर्वरीत 6 सदस्यांची नावे पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे.

संस्थांनच्या अध्यक्षपदी विविध क्षेत्रातील तज्ञ असावेत, असे बंधन न्यायालयाने घातले आहे. त्यानुसार आमदार काळे यांची अभियांत्रिकी क्षेत्रातून तर सावंत यांची कायदा क्षेत्रातून निवड केल्याचे राजपत्रात म्हटले आहे. विश्वस्त मंडळांवर नेमणूक केलेल्यांची नावे अशी : अविनाश अप्पासाहेब दंडवते, सचिन रंगराव गुजर, सुहास जर्नादन अहेर, एकनाथ भागचंद गोंदकर (काँग्रेस), अनुराधा गोविंदराव आदिक, सुरेश गोरक्षनाथ वाबळे, जयवंत पुंडलिकराव जाधव, महेंद्र गणपतराव शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस), राहुल नरेन कनाल (शिवसेना)  याशिवाय शिर्डी नगरपंचायतीचे अध्यक्ष हेही पदसिद्ध विश्वस्त असतात.

 

Web Title : NCP MLA Ashutosh Kale appointed as President of Shirdi Sansthan

 

हे देखील वाचा :

Pune Journalist Arrest | व्यावसायिकाकडे 5 लाखांची खंडणी मागणार्‍या पत्रकार अर्जुन शिरसाठ याला अटक; यापूर्वीही उकळली होती पाच लाखांची खंडणी, फोनवरील संभाषणातून उघड

Surekha Punekar | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Pune NCP | नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदारीचे नियुक्तीपत्र प्रदान; शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले – ‘पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणारच’

 

Related Posts