IMPIMP

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

by nagesh
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Nitesh Rane On Sanjay Raut | महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. त्याहूनही शिवसेना (Shivsena) आणि भाजप यांच्यात तर राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळते. अशातच भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. ‘अयोध्या सोडा. पण संजय राऊत मुंबई-महाराष्ट्रात एकटे तरी फिरले तरी काय अवस्था होईल हे कळेल,’ असा जोरदार निशाणा त्यांनी लगावला आहे.

नितेश राणे म्हणाले, ”संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना महत्व द्यायचे नाही, असे आम्ही ठरवले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा संजय राऊत यांनी एकटे अयोध्या सोडा, मुंबई-महाराष्ट्र तरी फिरले तरी काय अवस्था होईल हे कळेल.
संपूर्ण दिवस शरद पवार यांची आणि अन्य लोकांची हाजी-हाजी करुन परत एकदा खासदार झाले आहेत.
राऊत हे नक्की शिवसेनेच्या की राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदार झाले आहेत,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे नितेश राणे म्हणाले, ”केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले.
मात्र राज्यातील सत्ताधाऱ्यांना एक टक्का लाज उरली आहे वाटतं, त्यामुळे त्यांनी काहीतरी दिखावा केला आहे.
मागील अनेक दिवसांपासून आम्ही राज्य सरकारकडे इंधनावरील कर कमी करण्याची मागणी करत होतो. पण, नंतर आम्हाला समजले आर्थिक बजेटचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त बॅगा आणणे आणि बॅगा पोहोचवणे एवढेच येते.” अशी टीका त्यांनी केली.

Web Title : Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Rajyasabha Election | राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना फॉर्म्युल्यावर संभाजीराजेंमध्ये समझोता

Ajit Pawar On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या सभेनंतर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘राज ठाकरेंनी हवं ते म्हणावं, आम्हाला मात्र…’

Petrol-Diesel Rates Reduced | केंद्र सरकारनंतर राज्याचा देखील मोठा निर्णय ! पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त, जाणून घ्या

Raj Thackeray Pune Sabha | ‘आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं, वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही?’ मुख्यमंत्री ठाकरेंपासून शरद पवारांपर्यंत आणि आयोध्या दौर्‍यापासून ते MIM बद्दलचे राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे

Pune Crime | दुचाकीच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यु; अल्पवयीन मुलासह दुचाकीमालकाविरोधात गुन्हा दाखल

Related Posts