IMPIMP

हर्षवर्धन पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘वीज तोडणी मोहीम हे ‘महाविकास’चं अपयश’

by pranjalishirish
power cut campaign state failure mahavikas aghadi government harshvardhan patil attack

इंदापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – सध्याच्या काळात शेतकरी बांधव कोरोना आणि त्यानंतर झालेल्या तीव्र अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या अगदी कोलमडून पडला आहे. सध्या शेतकऱ्यांना या कठीण परिस्थितीत दिलासा देण्याची गरज असताना ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम जुलमी पद्धतीने राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे, अशी टीका भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील Harshvardhan Patil यांच्याकडून करण्यात आली आहे.

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

सध्या इंदापूर तालुक्याचे राज्यमंत्री हे विकासाच्या पोकळ गप्पा मारत आहेत. मात्र सध्या राज्य सरकारकडून वीज तोडणीची मोहीम राबवण्यात येत आहे. यावर सध्याचे राज्यमंत्री एक शब्दसुद्धा बोलत नाहीत. कोरोना, अतिवृष्टी तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज तोडणीमुळे शेतातील पिके जळून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता महाआघाडी सरकारने तात्काळ शेतीपंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी हर्षवर्धन पाटलांकडून Harshvardhan Patil करण्यात आली आहे.

Sachin Vaze Case : माजी खासदार संजय निरूपम यांचा शिवसेनेवर घणाघात, म्हणाले…

सध्या शेतीसाठी वीजपुरवठा महत्वाचा आहे. कारण माझ्या मंत्रिपदाच्या काळात वीज उपकेंद्राची मोठ्या संख्येने निर्मिती केली. तसेच माझ्या काळात एकदापण शेतकऱ्यांची वीज तोडली गेली नाही. मात्र आताच्या राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांवर वीज तोडीचे संकट टाकले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याचे चारा पिके, भाजीपाला पिके करपून जात आहेत. या सगळ्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे असे हर्षवर्धन पाटील Harshvardhan Patil यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

पुण्यात होणार्‍या वन डे मालिकेसाठीचा टीम इंडियाचा संघ जाहीर !

इंदापूर तालुक्यात सर्वाधिक वीज उपकेंद्रांचे जाळे
मी वीस वर्षे मंत्रिपदाच्या कार्यकाळात काय केले असे विचारणार्‍या राज्यमंत्र्यांनी त्यांच्या काळात तालुक्यातील एक तरी वीज उपकेंद्र उभे केले का? उलट मी राज्यात सर्वाधिक वीज उपकेंद्रांचे जाळे इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण केले आहे. त्यामुळे गेल्या २५ वर्षात शेतीला पुरेशा दाबाने व नियमितपणे वीजपुरवठा होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मुंबईत Lockdown होणार की नाही? पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

बांधकाम राज्यमंत्र्यांच्या तालुक्यात वाढते अपघात
मागील काही दिवसांपासून बांधकाम राज्यमंत्र्यांच्या इंदापूर तालुक्यामध्ये रस्ते अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यांच्या कामासंदर्भात ठेकेदारांनी साईडपट्ट्या न भरणे आदी रस्ता सुरक्षिततेच्या संदर्भात योग्य उपाययोजना करण्यात न आल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या सगळ्यांना जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची सध्या गरज आहे. असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

Also read : 

त्यांच्या’ प्रामाणिकपणाला सलाम ! 10 वर्षे नगरसेवक, 5 वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष अन् आता करताहेत वॉचमनची नोकरी

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

नाराज असलेल्या वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंच्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये परमबीर सिंह, माजी DGP जयस्वाल यांच्यावर आरोप; पोलीस दलात खळबळ, मुख्यमंत्री ठाकरेंना लिहीलं होतं पत्र

Gulabrao Patil : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ‘कोरोना’ पाँझिटिव्ह

रितिकाच्या आत्महत्येवर गीता फोगाट म्हणाली, ‘जिंकणं-हारणं हा तर खेळाडूच्या आयुष्याचा भाग’

IPL 2021 : ‘मुंबई इंडियन्स’ला मोठा फटका, पाकिस्तानमुळं वाढलं टेन्शन ! जाणून घ्या नेमकं प्रक

राष्ट्रवादीने केले CM उद्धव ठाकरेंचे समर्थन, म्हणाले – ‘वाझेंना सेवेत घेण्यासाठी फडणवीसांवर कोणाचाही दबाव नव्हता’

Related Posts