IMPIMP

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

by nagesh
priyanka gandhi tweeted video and targets devendra fadnavis

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले होते. हे समजल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पोलिस ठाण्यात गेले. त्यावरून आता त्यांच्यावर थेट दिल्लीतून निशाणा साधला गेला. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी एक व्हिडिओ ट्विट करून फडणवीसांवर टीका केली.

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यातच रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. पण या रेमडेसिव्हिरच्या इंजेक्शनवरून महाराष्ट्रात राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यानंतर आता यावरून प्रियांका गांधी Priyanka Gandhi यांनी एक व्हिडिओ ट्विट करून भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून रेमडेसिव्हिरची मागणी होत आहे. जीव वाचविण्यासाठी रेमडेसिव्हिर मिळावे, म्हणून लोक प्रयत्न करत आहेत. अशावेळी एका महत्त्वाच्या पदावर राहिलेल्या भाजपच्या नेत्याने रेमडेसिव्हिरची साठेबाजी करणे, मानवतेविरुद्ध आहे’.

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’

दरम्यान, प्रियांका गांधी Priyanka Gandhi यांनी हे वक्तव्य करताना देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांचा पोलिस ठाण्यातील व्हिडिओ जोडला आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे बोलत आहेत, हे दिसत आहे.

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

अभ्यास करून बोलावं; भाजपचे प्रत्युत्तर
प्रियांका गांधी यांच्या फडणवीसांवरील टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
त्यामध्ये ‘महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत आहेत.
राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि बेड्सचा तुटवडा जाणवत आहे.
लोक रस्त्यावर मरत आहेत. महाराष्ट्र सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरत आहे.
प्रियांका गांधी यांनी अभ्यास करून बोलायला हवे’.

Also Read :

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

Related Posts