IMPIMP

Pune MNS | ‘उघड दार उद्धवा आता…’, भाजपनंतर मनसेचं पुण्यात खुली करण्यासाठी आंदोलन

by nagesh
Pune MNS | pune protest by mns for opening of temple in state raj thackeray

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune MNS | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे अद्यापही बंद आहेत. राज्यातील मंदिरे खुली (opening temple) करावीत यासाठी भाजपने (BJP) राज्यभरात आंदोलनं केली. भाजप पाठोपाठ मनसेने (Pune MNS) देखील मंदिरे खुली करावीत यासाठी पुण्यात आंदोलन केले आहे. भाजपच्या ‘शंखनाद’ आंदोलनानंतर मनसेने ‘घंटानाद’ आंदोलन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घोषणेनंतर पुण्यातील मनसे (Pune MNS) कार्यकर्त्यांनी तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर (tambdi jogeshwari temple) घंटानाद आंदोलन केले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

जनआशीर्वाद यात्रा (jana ashirwad yatra), मेळावे, परस्परविरोधात आंदोलने होत आहे. मात्र, सण आला की कोरोनाचे (Coronavirus) कारण देत निर्बंध कठोर केले जातात. लॉकडाऊन (Lockdown) आवडे सर्वांना अशी राज्य सरकारची (State Government) परिस्थिती आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर (Uddhav Thackeray government) निशाणा साधला होता. नियम सर्वांना सारखे असले पाहिजे. एकाला एक नियम आणि दुसऱ्याला दुसरा, हे बरोबर नाही. शिवसेना (Shivsena) विरोधात असती तर त्यांनी काय केले असते, असा सवाल राज ठाकरे यांनी मंगळावारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता.

राज ठाकरे म्हणाले, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. म्हणजे यांच्यासाठी मंदिरं सुरु, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी मेळावे, सभा घ्यायच्या पण आम्ही दहीहंडी साजरी करायची नाही. कुठूनही गर्दी कमी झालेली दिसत आहे का ? जन आशीर्वाद यात्रा झाली ती चालली. तेव्हा तुमचा लॉकडाउन नाही.
पण सण आला की लॉकडाऊन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते, असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे सरकारला लक्ष केलं.

 

Web Title : Pune MNS | pune protest by mns for opening of temple in state raj thackeray

 

हे देखील वाचा :

Pune Crime | चुलत भावाचा फोटो ‘डीपी’ला ठेवून तरुणाला 4 लाखांचा ‘गंडा’

Pune Weather Update | पुण्यात आज ढगाळ वातावरण; दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता

Pune News | शिवणे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

Related Posts