IMPIMP

Sachin Vaze Case : महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता

by pranjalishirish
sachin vaze case one or two ministers of the mahavikas aghadi are likely to be questioned by nia

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणी आणि मनसुख हिरने मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) मुळं एनआयए नं एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांची तडकाफडकी बदलीही करण्यात आली. या प्रकरणी आता महाविकास आघाडीमधील एक-दोन मंत्र्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई क्राईम ब्रांचचे जॉईंट कमिश्नर मिलिंद भारंबे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही एनआयएकडून माहिती घेण्यासाठी बोलवलं जाण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे यांच्या कामाची पद्धत कशी होती हे एनआयए ला जाणून घ्यायचंय

सध्या या प्रकरणाचा तपास एनआयए कडून केला जात आहे. त्यामुळं आता वेगानं हालचाली होताना दिसत आहेत. आगामी एक-दोन दिवसातच सर्वांची चौकशी केली जाऊ शकते. सचिन वाझे Sachin Vaze  हे सीआययुमध्ये नियक्त होते. मुंबई क्राईम ब्रांचच्या अंतर्गत हा विभाग येतो. सचिन वाझे यांचे डिटेक्शन क्राईम ब्रांचचे उपायुक्त प्रकाश जाधव, जॉईंट पोलीस कमिश्नर मिलिंद भारंबे हे वरिष्ठ होते. त्यांना रिपोर्ट करणं सचिन वाझे यांना बंधनकारक होतं. मात्र सचिन वाझे हे डायरेक्ट पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या संपर्कात होते. त्यामुळं सचिन वाझे यांच्या कामाची पद्धत कशी होती हे एनआयए ला जाणून घ्यायचं आहे.

‘या’ मुद्द्यांवरून मिलिंद भारंबे आणि इतर अधिकाऱ्यांकडे चौकशी होणार

हृतिक रोशन फेक ईमेल आयडी, फेक इंस्टाग्राम फॉलोवर्स, टीआरपी, डीसी अवंतिका हे महत्त्वाचे गुन्हे त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते. या सगळ्यामुळं सचिन वाझे चर्चेत आले होते. या सर्व केसेस सचिन वाझे यांच्याकडे कशा गेल्या. त्या केसेस माहितीच्या आधारावर झाल्या आहेत की, कशा प्रकारे झाल्या आहेत. सचिन वाझे यांच्याकडे केसेस कशा सोपवल्या जायच्या. जिलेटीन कार प्रकरण वाझे यांच्याकडे का देण्यात आलं. त्याचा प्रमुख तपास अधिकारी म्हणून सचिन वाझे यांना कुणी आणि का नेमलं ? प्रोसिजरप्रमाणे नेमलं गेलं की, इतर काही कारण होतं असे मुद्दे आहेत ज्यावरून आता मिलिंद भारंबे आणि इतर अधिकाऱ्यांकडे चौकशी केली जाणार आहे अशी माहिती समजत आहे.

Also Read : 

WB Elections : ममतादीदींकडून आश्वासनांची बरसात

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही… मग नियुक्त्या का थांबल्या ?, स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्विटरवरुन सरकारला प्रश्न

Related Posts