IMPIMP

अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचे कनेक्शन ‘मातोश्री’वर, ‘या’ महिला खासदाराचा खळबळजनक आरोप

by bali123
maharashtra cm uddhav thackeray coronavirus lockdown

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझे यांच्या अटकेनंतर विरोधकांनी राज्यातील ठाकरे सरकारला धारेवर धरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी केली. सचिन वाझे यांना राज्य सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. आता सचिन वाझे आणि अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचे कनेक्शन थेट मातोश्रीवर असल्याचा गंभीर आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा navneet rana यांनी केला आहे.

खासदार नवनीत राणा navneet rana यांनी या प्रकरणात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. नवनीत राणा म्हणाल्या, सचिन वाझे प्रकरण आणि अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचे धागेदोरे मातोश्रीवर आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिस कोणाच्या दबावाखाली होते. तपास योग्य पद्धतीने का झाला नाही. याचा शोध घेतला तर या सर्वांच्या तारा मातोश्रीवर जुळून आल्याचे दिसून येईल. या प्रकरणाचे कनेक्शन मातोश्रीर काही ना काही तरी असल्याचे लोकांना स्पष्टपणे दिसून येत आहे. याचा उलगडा एनआयएच्या तपासात होईलच. आता लवकरच दुध का दुध आणि पाण्याचे पाणी होईल, असा दावा राणा यांनी केला आहे.

दरम्यान, सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार समोरील अडचणीत वाढ होत आहे. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक बड्या नेत्यांमध्ये सतत बैठका होत आहे. आज दिल्लीमध्ये शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. अर्ध्यातासाच्या बैठकीत या दोन नेत्यांमध्ये राज्यातील विविध मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

NIA नं तपास पूर्ण झाल्यानंतर बोलावं, विनाकारण बातम्या पसरवू नयेत – जयंत पाटील

 

‘कोरोनाचं महाराष्ट्रावर की सरकारचे कोरोनावर प्रेम?’, मनसेचा खोचक सवाल

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

 

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

 

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

 

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

Related Posts