IMPIMP

Sambhaji Patil Nilangekar | संभाजी पाटील निलंगेकरांचा पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर गंभीर आरोप

by nagesh
Sambhaji Patil Nilangekar | sambhaji patil nilangekar allegations of corruption on amit deshmukh

लातूर : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव वाढत असताना लातूरमध्ये (Latur) मोठा
भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केला आहे. लातूरचे पालकमंत्री
अमित देशमुख यांच्या आशीर्वादाने कोरोना काळात लातूर जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने (Administration) प्रचंड भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा
गंभीर आरोप भाजप नेते (BJP Leader) आणि माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पीपीई किट (PPE Kit) असेल किंवा कोविड रुग्णांना (Covid Patient) देण्यात येणारा आहार (Diet) असेल यामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आला.
एका पेशंटला तपासण्यासाठी एक पीपीई किट दोन हजार रुपये किंमतीने खरेदी करण्यात आले.
त्यातही मोठा घोळ करण्यात आला.
तसेच रुग्णांना देण्यात आलेल्या आहाराचा खर्च आठ कोटी रुपये दाखवण्यात आला, असा दावा संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केला आहे.

या सगळ्यांचा हिशोब जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning Committee) बैठकीत वारंवार मागून देखील समोर आणला जात नाही.
जिल्हा प्रशासन उडवा-उडवीची उत्तरे देतंय.
हा सगळा भ्रष्टाचार विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या आशिर्वादामुळेच झाल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka) आणि तेलंगणा (Telangana) या तीन राज्याच्या सीमेवर (State Border) लातूर जिल्ह्याच्या हद्दीत सर्वात मोठा जुगाराचा अड्डा (Gambling Den) देखील पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरु असल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे.

Web Title :  Sambhaji Patil Nilangekar | sambhaji patil nilangekar allegations of corruption on amit deshmukh

हे देखील वाचा :

Karuna Munde | ‘मला अजूनही न्याय मिळाला नाही. पण मी समाधानी’ ! करूणा मुंडे म्हणाल्या – ‘धनंजय मुंडे स्वत:हून मला…’

Coronavirus | कोरोना विषाणूवरील प्रभावी 2 नव्या औषधांच्या वापराला WHO ची मंजूरी

Sugar Patients Diet | ’शुगर फ्री’ आहेत ‘ही’ 5 फळे आणि भाज्या, तज्ज्ञांनी डायबिटीज रूग्णांना दिला खाण्याचा सल्ला

Related Posts