IMPIMP

Sanjay Raut | सध्या महाराष्ट्रात फक्त ठाकरे-पवार पॅटर्नचा बोलबाला, संजय राऊत म्हणाले – ‘पुणे आणि पिंपरी चिंचवडचा महापौर शिवसेनेचा असेल, आम्ही जुळवून घेण्याचा प्रयत्न करु’ (व्हिडीओ)

by nagesh
Sanjay Raut | pune pimpri chinchwad next mayor will be from shivsena mp sanjay rauts claim in pune today

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिका निवडणूक (Municipal elections) आणि राजकीय गणितांवर मोठं भाष्य केलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत आमचा महापौर असेल, असे मोठे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. मात्र यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचा (NCP) उल्लेख करत आम्ही जुळवून घेण्याचा प्रयत्न करु असेही राऊतांनी म्हटले. तसेच पुण्यासारख्या शहरात शिवसेनेचा महापौर (Mayor) असावा अशी पुणेकरांची इच्छा असल्याचं सूचक वक्तव्य केलं. राऊतांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

https://fb.watch/8CmRDu_Nqx/

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राज्यात ठाकरे-पवार पॅटर्नचा बोलबाला

राज्यात अनेक पॅटर्न येताता आणि जातात. मात्र महाराष्ट्रात सध्या ठाकरे-पवार पॅटर्नचा (Thackeray-Pawar pattern) बोलबाला आहे. हा एक चलनी पॅटर्न आहे.
दोन प्रमुख पक्ष, त्यात काँग्रेस सोबत आली तर काय होते हे सर्वांनी पाहिले आहे.
आम्ही आगामी महापालिका निवडणुकीत मतांचे विभाजन होऊ देणार नाही, असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

कार्यकर्ते आणि पुणेकरांची इच्छा

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) सातत्याने पुण्यात येत होते. आम्ही पुण्यामध्ये संघटनेचं काम करते.
तरी देखील पुण्यात आमचा महापौर बसू शकला नाही.
त्यामुळे पुणेकर आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
आमचं स्वप्न आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांवर शिवसेनेचा महापौर असावा.

देवेंद्र फडणवीसांना टोला

अजुनी यौवनात मी.. असे अनेकांना वाटतं. हे नाटक रंगमंचावर खूप गाजलं.
तसं अनेकांना वाटतं की अजुनी यौवनात मी. मी अजूनही मुख्यमंत्री… आम्हालाही दिल्लीला गेल्यानंतर पंतप्रधान (PM) आमचा होणार असं वाटतं.
असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

Web Title : Sanjay Raut | pune pimpri chinchwad next mayor will be from shivsena mp sanjay rauts claim in pune today

हे देखील वाचा :

Ranveer Singh | बॉलिवूडचं लव्ह बर्ड ! रणवीर सिंग स्वतःला म्हणतो ‘Husband Of The Century’; जाणून घ्या कारण

Arthritis Disease | सावधान ! केवळ ज्येष्ठांमध्ये नव्हे, 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना देखील होऊ शकतो हाडांचा ‘हा’ भयंकर आजार

Dilip Walse Patil | पोलिसांच्या प्रतिमेबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना चिंता, DGP ऑफिसमध्ये घेतली आढावा बैठक

Related Posts