IMPIMP

होळी : रंगांचा सण आणि जातीवादाच्या विरूद्ध एका संताच्या संघर्षाची कथा?

by bali123
story of sant tukaram amid holi and indigenous asur version of festival

नवी दिल्ली : अनेक शतकांपासून भारतातील आदिवासी, शोषीत समाजांचे कार्यकर्ते आणि इतिहासकार चर्चा करत आहेत की, होळीबाबत ज्या परंपरा आणि कथा रूजवण्यात आल्या आहेत, त्यांचे सत्य समोर कसे आणावे. रंग आणि सद्भावनेचा सण, होलिका दहनाच्या रूपात वाईटावर चांगुलपणाच्या विजयाच्या कथेला एक मोठा वर्ग खोटा प्रोपगंडा सांगत आला आहे. याच बाबतीत कमी सांगितली गेलेली एक कथा आहे प्रसिद्ध मराठी संत तुकाराम sant tukaram यांच्या मृत्यूची, ज्यास हा वर्ग हत्या म्हणतो आणि होळीच्या दिवशी उत्साह नव्हे, तर शोक म्हणून व्यक्त करतो.

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

हिरण्यकश्यप आणि होलिका हे आदिवासी वंशाचे असल्याचे सांगत हा वर्ग म्हणतो की, ब्राह्मण या समाजाला राक्षस म्हणत असत आणि जाच करत होते. याच राक्षसांना आधुनिक इतिहासात दलित, आदिवासी किंवा वंचित व शोषित समाज म्हटले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आणि समाजवादी विचारवंत जमनादास यांचा होळी आणि बहुजन समाजाच्या छळावर आधारित लेख याबाबत अनेक बाजू उघड करतो. येथूनच संत तुकारामांची कथा समोर येते…

ब्राह्मणवादाच्या विरूद्ध होते संत तुकाराम sant tukaram
मराठी संत आणि साहित्याच्या ’वारकरी’ परंपरेत सर्वश्रेष्ठ नाव संत तुकाराम sant tukaram यांचे मानले जाते. ब्राह्मणवाद्यांनी संत तुकाराम यांना मवाळ म्हटले तर बहुजन इतिहासकार म्हणतात की ब्राह्मणांकडून होणार्‍या शोषणाचे ते प्रखर विरोधक होते. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी याबाबत ’विद्रोही तुकाराम’ हे प्रसिद्ध पुस्तक सुद्धा लिहिले आहे. या पुस्तकानुसार ’एका वाघाला बकरी बनवून सादर केले गेले, तसेच संत तुकारामांनी वैदिक ज्ञान, ब्राह्मणांचा अत्याचार आणि जातीय भेदभावावर आयुष्यभर टीका केली.

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

कार्ल मार्क्सच्या 200 वर्ष अगोदर झालेल्या संत तुकाराम यांनी त्या चोपड्या पाण्यात बुडवल्या होत्या, ज्या शेतकर्‍यांच्या जमीनी गहाण ठेवून कर्ज देण्यासंबंधी होत्या. संत तुकाराम यांना एकीकडे ब्राह्मणांनी मवाळ संत म्हणून इतिहासात नोंदवले परंतु दुसरीकडे हे सांगितले नाही की ते ब्राह्मणच होते, ज्यांनी संत तुकाराम यांनी लिहिलेले अभंग नष्ट करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती.

जेव्हा संत तुकारामांविरूद्ध चालला खटला
हिंदुंच्या वर्ण व्यवस्थेवर टीका करणार्‍या संत तुकारामांनी एक मोठे आणि महत्वाचे कार्य केले होते. संत बहिणाबाई ब्राह्मण असूनही त्यांच्या शिष्या होत्या आणि त्यांच्या द्वारे संत तुकारामांनी अश्वघोष यांनी लिहिलेला संस्कृत ग्रंथ ’वज्रशुची’चे भाषांतर मराठीत करून घेतले होते, ज्यामध्ये जाती व्यवस्थेवर कठोर टीका होती. संत तुकाराम नेहमी आरोप करत असत की, ब्राह्मणांनी संस्कृतमधील समाजहिताचे ज्ञान कधीही समोर येऊ दिले नाही.

जेव्हा स्टेजवर डान्स करू लागले भाजप आणि काँग्रेसचे टॉपचे 2 नेते, पाहा व्हिडीओ

बीजापुर सुलतानाच्या काळात मुस्लिम इतर प्रकरणात न्यायालये काम करत असत, जी ब्राह्मणांच्या वर्चस्वाखालील धर्मशास्त्रावर आधारितच होती. या न्यायालयामध्ये संत तुकारामांवर तीन आरोप झाले- शूद्र असूनही श्रुती शास्त्रांवर उपदेश देणे, ब्राह्मणांना आपले शिष्य बनवणे आणि ब्राह्मण शिष्यांकडून आपले चरणस्पर्श करून घेणे. या आरोपांखाली संत तुकारामांना किती कठोर शिक्षा दिली गेली..!

– त्यांचे सर्व अभंग, रचना पाण्यात बुडवण्यात आले आणि त्यांना काहीही लिहिण्यास प्रतिबंध घालण्यात आला.
– त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली.
– त्यांना समाजातून बाहेर काढण्यात आले. बहिष्कारानंतर गावातून बाहेर काढण्यात आले.

संत तुकाराम यांचा सत्याग्रह
नानासाहेब पेशवा यांच्या ब्राह्मणवादी शासन काळात सुद्धा संत तुकाराम यांचे अभंग कुणी गाऊ शकत नव्हते, अन्यथा त्यास शिक्षा केली जात असे. एक स्मरणीय प्रसंग संत तुकाराम यांच्या सत्याग्रहाचा सुद्धा आहे, जेव्हा त्यांनी याच ब्राह्मणवादी विचार आणि व्यवस्थेविरूद्ध नदी किनारी 13 दिवस निर्जलीय उपोषण केले होते. त्यावेळी लोकांचे मोठे समर्थन त्यांना मिळाले होते आणि हा सत्याग्रह दडपण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते. यानंतर पुढील अनेक वर्षापर्यंत संत तुकाराम अशाच प्रकारे व्यवस्थेशी लढा देत होते, त्यांच्या मृत्यूच्या कथेसाठी एवढी पार्श्वभूमी आवश्यक आहे…

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

संत तुकाराम sant tukaram यांचा मृत्यू; हत्या होती का?
संपूर्ण आयुष्य ब्राह्मणवादी व्यवस्थेशी लढणार्‍या केवळ 42 वर्षांच्या संत तुकारामांच्या अखेरच्या दिवसाचा इतिहास बहुजन इतिहासकार अशा प्रकारे सांगतात की, अंगावर काटा उभा राहू शकतो. संत तुकाराम यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आले आणि जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला ब्राह्मणांनी अशी कथा ऐकवली की, त्यांच्या प्रिय संताने ’स्वर्ग’तून ’देवांनी’ पाठवलेल्या एका विशेष ’विमानाने’ वैकुंठास प्रस्थान केले. असेही सांगण्यात आले की, एवढा सन्मान कधी कोणत्या ब्राह्मणालाही मिळाला नाही, जेवढा या शुद्राला मिळाला. आता सत्य काय होते?

…तो दिवस होळीचा होता
जमनादास यांच्या लेखानुसार, अनेक ठिकाणी असे लिहिण्यात आले की, नदी किनारी किर्तन करत असताना तुकाराम यांना ’गायब’ करण्यात आले होते. साळुंखे यांच्या पुस्तकात सुद्धा उल्लेख आहे की, त्यांचा मृतदेह कधी सापडलाच नाही. आणि तो दिवस होळीचा दिवस होता, ज्यास धुलीवंदन किंवा धुळवड म्हटले जाते. संत तुकाराम यांना मानणार्‍या वर्गासाठी तेव्हापासून होळीचा दिवस असभ्यतेचा, दु:खाचा आणि त्यांच्या ’संताच्या हत्येचा’ दिवस आहे.

West Bengal Assembly Elections : मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! PM मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जी विरोधात…


काय आहे होळीचे सत्य?
या कथेनंतर प्रश्न उपस्थित होतो की, होळीच्या पाठीमागे पूर्णसत्य काय आहे? 19व्या शतकातील विचारवंत आणि समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी ’गुलामगिरी’ शीर्षकाच्या लेखात कशाप्रकारे होळीबाबत चुकीचा प्रचार करण्यात आला हे सांगितले आहे. फुले यांच्यानुसार, होलिका दहनाची कथा अशाप्रकारे होती की, होलिकाला ब्राह्मण कट्टरतावाद्यांची चाल माहित होती, जे तिचा समाज आणि संस्कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. प्रल्हादाचे मतपरिवर्तन केल्यानंतर संघर्ष करत असलेल्या होलिकेला जाळण्यात आले होते.

एवढेच नव्हे, संविधानाचे निर्माते आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा याबाबत खुप लिखाण केले असून सांगितले आहे की, कशाप्रकारे हिंदुचे अनेक सण आदिवासी संस्कृती आणि बौद्ध परंपरेच्या विरूद्ध करण्यात आले आणि या परंपरा स्थापन करण्यामागे कशाप्रकारे एक खूनी इतिहास आहे.

Also Read

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

Related Posts