IMPIMP

West Bengal Assembly Elections : मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! PM मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जी विरोधात…

by pranjalishirish
west bengal assembly elections 2021 mithun chakraborty said narendra modi says ready contest mamata

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भाजपवासी झालेले अभिनेते मिथून चक्रवर्ती Mithun Chakraborty  यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होण्यास आपली तयारी आहे. आता पक्षाने काय तो निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. भाजपने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. या पदासाठी मिथून इच्छुक असल्याचे दिसून येते. मिथून म्हणाले की, माझ्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता असेल तर मी नक्कीच मुख्यमंत्री होईल. भाजपने आपल्या उमेदवारांची शेवटची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर केली. यामध्ये मिथुन यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, मिथुन यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

अभिनेते मिथुन चक्रवर्ती  Mithun Chakraborty यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला. मिथुन हे भाजपचे स्टार कँपेनर आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मिथुन म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यास आपण ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणुक लढण्यासही तयार आहोत. भाजपने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे या पदासाठी मिथुन चक्रवर्ती इच्छुक असल्याचे दिसून येते. मिथुनच्या रोड शोला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीतून लोकांचे पंतप्रधानांवर असलेले प्रेम दिसून येते. त्यामुळे बंगालमध्ये बदल घडेल असा अंदाज देखील मिथुन यांनी व्यक्त केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

मिथुन चक्रवर्ती  Mithun Chakraborty यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करुन पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदींच्या उपस्थित त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांनी मिथुन यांना केंद्राने Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या प्रवेशानंतर मिथुन यांनी पंतप्रधानांसोबत मंचावर उभं राहण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हटले होते. तसेच सभेत आक्रपणे भाषण करताना दिसून आले.

Also Read

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

‘त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’

‘होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, राज्यात सरकार उद्धव ठकारेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?’

Related Posts