IMPIMP

Sanjay Raut On Kirit Somaiya | ‘किरीट सोमय्या भ्रष्ट माणूस, ज्यानं देशाची चोरी केली ते मानहानी काय करणार ?’ – संजय राऊत

by nagesh
shivsena leader and MP sanjay raut criticism on bjp leader kirit somaiya on defamation case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Sanjay Raut On Kirit Somaiya | मागील अनेक दिवसांपासून भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात अनेक कारणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. अशातच भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सतत शिवसेनेवर टीकेची झोड उठवत आहेत. नुकतंच सोमय्यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. यावरुन आता संजय राऊत यांनी सोमय्यावर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले, ”किरीट सोमय्या हा भ्रष्ट माणूस आहे. ज्याने देशाच्या संरक्षण व्यवस्थेसंबंधी आयएनएस विक्रांत वाचवा या नावावरुन लोकांकडून पैसे गोळा केले आणि ते पैसे जमा केले नाहीत. असा विक्रांत घोटाळा करणारा माणूस ज्याने देशाची मानहानी केली, ज्याने देशाची चोरी केली ते काय मानहानी करणार,” असं ते म्हणाले.

”माझ्यावर एक हजार कोटीचा मानहानीचा गुन्हा दाखल करुन द्या, त्यांना काम काय आहे,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
अजून त्यांनी काही बघितलं नाही, भविष्यात त्यांना बरच काही बघायचे असल्याचं ते म्हणाले.
त्याचबरोबर ‘किरीट सोमय्या हे विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आहेत. जामीन वर ते सुटले आहेत.
त्याच्यावर कोर्टाने अटी आणि शर्थी घातल्या आहेत. देवाने तोंड दिलं आहे म्हणून ते काहीही बोलत असल्याचं,” संजय राऊत म्हणाले.

Web Title :- shivsena leader and MP sanjay raut criticism on bjp leader kirit somaiya on defamation case

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Crime | दारू पिण्याबाबतचा उपदेश पडला महागात ! ताडीवाला रोड परिसरात दोघांनी फोडली एकमेकांच्या डोक्यात बिअरची बाटली

Restaurants Service Charges | रेस्टॉरंट्समध्ये जेवण करणे स्वस्त होणार?; सर्व्हिस चार्जला आळा घालण्यासाठी मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

Sambhajiraje Chhatrapati | शिवबंधन बांधणार की नाही ?; छत्रपती संभाजीराजे म्हणाले…

Related Posts