IMPIMP

सोलापुरात राष्ट्रवादीत दिसतोय ‘उत्साह’, पण शिवसेनेला ‘मरगळ’ !

by pranjalishirish
solapur : ncp and shivsena news

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राज्यात शिवसेना shivsena, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यानुसार महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यामध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यात आले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांकडेही मंत्रिपदे असल्याने त्यांच्याकडून राज्यभर दौरे करणे झाले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. दत्तात्रय भरणे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. भरणे जेव्हा सोलापूर दौऱ्यावर आले तेव्हा त्यांच्याभोवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गर्दी झाली. मात्र, त्यामध्ये शिवसेनेचे shivsena पदाधिकारी दिसले नाहीत. सत्तेत असूनही पदाधिकाऱ्यांची कामं होत नसल्याचे दिसत आहे. तसेच सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहिलेला नाही. सोलापुरातील नेतेमंडळी शिवसेनेपासून दुरावत जात असल्याचे चित्र आहे.

त्यामध्ये माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी शहराध्यक्ष प्रताप चव्हाण, माजी सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांच्यासारख्या नेतेमंडळींचा समावेश आहे. तसेच दुसऱ्या पक्षातून शिवसेनेत shivsena आलेली नेतेमंडळीही पक्षात सक्रिय दिसत नाहीत. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेनेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत हेही पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी आलेले नाहीत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी चांगलीच उत्साहात असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, तानाजी सावंत यांना सोलापूरचे संपर्कप्रमुख केल्यानंतर पक्षात उत्साह निर्माण झाला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून झालेल्या मतभेदानंतर त्यांच्याविरोधात पक्षामध्ये नाराजी वाढली आहे. त्यानंतर आता सोलापूरसाठी स्वतंत्र संपर्कप्रमुख नियुक्त करावा आणि ती व्यक्तीही सोलापूरची असावी, अशी मागणी केली जात आहे.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

Related Posts