IMPIMP

State Government । ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार

by bali123
State Government । maharashtra education department issue gr for starting classes of 8 to 12 in covid free area

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)  State Government । कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सरकारने शाळा, महाविद्यालय बंद केले. प्रत्यक्ष शिक्षणाऐवजी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणास प्राधान्य देण्यात आले. सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) ओसरत आहे. राज्यात काही जिल्हे सोडून उर्वरित जिल्ह्यात सर्व आस्थापना सुरु केल्या आहे. मात्र, शाळा कॉलेज सुरु कधी होणार याचाच प्रश्न लागून होता. मात्र, राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत राज्य सरकारनं (State Government) मोठा निर्णय घेतला आहे. State Government । maharashtra education department issue gr for starting classes of 8 to 12 in covid free area

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं (Department of School Education, Maharashtra) निर्णय घेतला आहे.
कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या ठरावांनी शासन निर्णयात जारी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास मंजुरी देण्यात आलीय.
दरम्यान, ग्रामीण भागात कोरोना मुक्त गावातील ग्रामपंचायतीनं त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरु करणेबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करण्याचे नमूद केले आहे.
तर, शाळा सुरु करताना मुलांना टप्प्या टप्प्यात शाळेत बोलवण्यात यावे अर्थात सकाळी आणि दुपारी महत्वाच्या विषयांना प्राधान्य देत शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावं असं या शासन (Government) निर्णयात नमूद केलं आहे.

याबाबत शासन नियमावली –

एका बाकावर एक विद्यार्थी, 2 बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे,
लगेच कोरोना टेस्ट (Corona test) करुन घेणे या नियमांचे पालन करण्यात यावे असं शासनाने शासन (Government) निर्णयात नमूद केलं आहे.
दरम्यान, संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात
यावी अथवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्यासंदर्भात दक्षता घेण्यात येण्याचं म्हटलं आहे.

शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना – (Government Guidelines)

> शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे.

> Thermometer, जंतूनाशक, साबण पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच
शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावी.
वापरण्यात येणारे थर्मामीटर हे कॅलिब्रेटेड कॉन्टॅक्टलेस अवरक्त डिजिटल थर्मामीटर असावे.

> एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते अन्य ठिकाणी स्थानापन्न करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्याअगोदर त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.

> क्वारंटाईन सेंटर अन्य ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात अथवा अन्य ठिकाणी भरवावी.

> संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड- 19 साठीची RTPCR / RAPID ANTIGEN टेस्ट करावी.

> वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतरच्या नियमांनुसार असावी.

> वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.

Web Title : State Government । maharashtra education department issue gr for starting classes of 8 to 12 in covid free area

Related Posts