IMPIMP

Suspension of 12 MLAs | 12 आमदारांचे निलंबन मागे न घेण्यावर महाविकास आघाडी ठाम

by bali123
Suspension of 12 MLAs | suspension mlas will continue consensus ruling party

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)  Suspension of 12 MLAs | महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्षांचे सभागृहात अभूतपूर्व गदारोळ आणि उपाध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ, हाणामारी करणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांवर निलंबन (Suspension of 12 MLAs) कारवाई कायम ठेवण्यावर एकमत झाले आहे. दरम्यान याच कालावधीत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नियमानुसार राज्यपालांनी तारीख ठरवून दिली पाहिजे. त्यामुळे राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. Suspension of 12 MLAs | suspension mlas will continue consensus ruling party

सोमवारपासून पावसाळी अधिवेशन (monsoon session ) सुरु झाले.
पहिल्याच दिवशी विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
तसेच उपाध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ, हाणामारी करणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांना निलंबित (BJP 12 MLAs suspended) करण्यात आले होते.
मंगळवारी विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकल्याचे लक्षात येताच निलंबन मागे घेतले जाईल अशी चर्चा सुरू झाली मात्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष निलंबनाच्या कारवाईवर ठाम आहेत.
यांसंदर्भात बोलताना एका ज्येष्ठ व्यक्तीने सांगितले की, विधान सभेच्या इतिहासात असा पहिल्यांदाच प्रकार घडला आहे.

या चुकीला माफी केली तर कोणीही सदस्य कसाही वागेल.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये निलंबन मागे घेणार नाही असे सांगितले.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी १८ सदस्यांनी गोंधळ घातला असता तर १८ जणांना निलंबित केले असते असे जाहीर केले.
तर आणखी एक नेत्याने या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले किभाजप सदस्यांचे ज्या पद्धतीने वागणे होते व सत्ताधाऱ्यांना दडपणाखाली ठेवण्यासाठी असे प्रकार सुरु आहेत त्याला आता जशाच तसे उत्तर दिले जाईल.
एकूणच कोणत्याही परिस्थितीमध्ये आमदारांचे निलंबन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही दुजोरा दिला आहे.
तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रतिक्रिया देताना म्हणाले की,
फडणवीस सरकारनेही २२ मार्च २०१७ रोजी १९ सदस्य निलंबित केले होते हे विसरू नये.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान,विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीबाबत (Election of Assembly Speaker) घडामोडी सुरु आहे.
मात्र नियमानुसार, अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी सरकारने राज्यपालांना पत्र दिले पाहिजे.
त्यानंतर राज्यपाल जी तारीख देतील त्या तारखेच्या एक दिवस आधी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. परंतु सध्याची परिस्थिती पाहता राज्यपाल निवडणुकीची तारीख देतील कि नाही याबाबत शंका आहे.
त्यांनी तारीख दिलीच नाही तर काँग्रेसला अध्यक्षपद लवकर मिळणे कठीण आहे.
दुसरीकडे राज्यपालांनी स्वत:हून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना व दुसरे विधिमंडळाला पत्र लिहून अध्यक्षपद लवकर भरावे असे सांगितले आहे.
एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीनुसार अध्यक्षपदाच्या निवडीसाठी तारीख द्या
असे मुख्यमंत्र्यांनी कळवल्यानंतर राज्यपालांना ती तारीख द्यावी लागेल.
हे घटनात्मक पद आहे. ते भरण्याची तयारी सरकारने दाखवल्यास फार काळ रिक्त ठेवता येणार नाही. राज्यपालांनी तारीख दिली नाही तर ते राजकारण करत असल्याचा आक्षेप येईल आणि तसा आक्षेप ते घेतील का? असा सवालही त्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या निवडीचा मार्ग म्हणावा तेवढा मोकळा राहिलेला नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

भाजपने विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला असताना अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी
दुपारी अचानक विधानसभेत आमदार रवी राणा अंगावर मागण्यांचे बॅनर लावून आले.
राणा थेट अध्यक्षांच्या आसनापर्यंत गेले.
तेथे ठेवलेला राजदंड त्यांनी उचलला आणि तो सभागृहाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी भास्कर जाधवच तालिका अध्यक्ष होते.
सुरक्षारक्षकांनी राजदंड पुन्हा जागेवर आणून ठेवला.
या प्रकारामुळे काही सदस्यांनी राणा यांनाही निलंबित करा.
अशी मागणी केली होती.

Web Title : Suspension of 12 MLAs | suspension mlas will continue consensus ruling party

Related Posts