IMPIMP

संतापलेल्या भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी थेट कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात लगावली, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

by pranjalishirish
WB Elections 2021 : babul supriyo gets angry holi milan celebration slapped party worker

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन-  पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वातावरण ढवळून निघाले आहे. याच दरम्यान एका होळी समारंभात उपस्थित असलेले भाजप खासदार बाबुल सुप्रियो babul Supriyo  संतापलेले दिसले. रागाच्या भरात त्यांनी सर्वांसमोर एका कार्यकर्त्याच्या जोरात थोबाडीत लगावल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीडित तरुणाने खासदार सुप्रियो यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे.

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

खासदार सुप्रियो babul Supriyo आणि एका तरुण कार्यकर्त्यात बोलताना वाद झाला. त्यानंतर सुप्रियो यांनी कोणताही विचार न करता थेट या कार्यकर्त्याच्या थोबाडीत मारली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 28) दुपारी बारा वाजता टॉलीगंज येथे होळी समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला खासदार सुप्रियो येण्यास दुपारचे अडीच वाजले होते. सुप्रियो प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना एका कार्यकर्त्याने तुम्ही आधीच उशीरा आल्याचे सांगितले. तसेच आतमध्ये सर्वजण तुमची वाट पाहात आहेत, असे सुनावले. यावर खासदार सुप्रियो चांगलेच नाराज झाले. माध्यमांशी बोलून झाल्यानंतर त्यांनी त्या तरुणाला पक्षाच्या कार्यालयात नेले आणि थोबाडात लगावली. मारहाणीची घटना प्रसारमाध्यमांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. आपण मारहाण करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड झाल्याच लक्षात येताच सुप्रियो यांनी पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेऊन तो बराच वेळ आपल्याकडे ठेवला होता. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

Also Read

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

‘त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’

‘होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, राज्यात सरकार उद्धव ठकारेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?’

Related Posts