IMPIMP

‘निवडणूक पश्चिम बंगालमध्ये अन् पंतप्रधान मोदी बांगलादेशातील काली मंदिरात’

by pranjalishirish
west bengal assembly elections 2021 pm narendra modi perform puja at jeshoreshwari kali temple in bangladesh

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा पहिला टप्पा आजपासून सुरु झाला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi  हे बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. ते दक्षिण-पश्चिमच्या ईश्वरीपूर गावातील प्राचीन जेशोरेश्वरी काली मंदिरात दाखल झाले आहेत.

वाहनधारकांना दिलासा ! ड्रायव्हिंग लायसन्स, RC वैधतेबाबत केंद्राची महत्वपूर्ण घोषणा

पंतप्रधान मोदी Narendra Modi  हे जेव्हा मंदिर परिसरात दाखल झाले तेव्हा त्यांचे स्वागत शंख वाजवून आणि टिळा लावून करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी देवीला एक मुकूट, साडी आणि इतर पूजेचे साहित्यही अर्पण केले. पंतप्रधानांनी देवाला अर्पण केलेल्या मुकूटाला सोन्याचा मुलामा देण्यात आला असून, हा मुकूट पारंपरिक कारागिरांद्वारे तीन आठवड्यांच्या काळात हातांनी बनवण्यात आला आहे. तसेच त्यांनी मंदिर परिक्रमाही केली. मंदिरातील फोटो पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी ‘जेशोरेश्वरी काली मंदिरात पूजा करून धन्य पावलो’ असे म्हटले आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये व्हिडिओही जोडला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आज मतदान पार पडत असलेल्या जागांपैंकी सर्वाधिक जागा नक्षलग्रस्त जंगलमहल भागातील आहेत. पंतप्रधान मोदींच्या बांगलादेशातील मंदिरभेटी पश्चिम बंगालच्या निवडणुकांशीही अप्रत्यक्षरित्या जोडलेल्या आहेत.

भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत ‘डान्स पार्टी’

सुगंधा शक्तिपीठाला देणार भेट

जिल्ह्यातील सुगंधा शक्तिपीठालाही पंतप्रधान मोदी Narendra Modi  भेट देणार आहेत. हिंदूंच्या 51 शक्तिपीठांपैंकी एक सुगंधा शक्तिपीठ समजले जाते. त्यानंतर पंतप्रधान बांगलादेशातील मतुआ समुदायाचे संस्थापक हरिचंद्र ठाकूर यांच्या ठाकूरबाडी म्हणजेच ओरकांडी मंदिरातही जाणार आहेत.

Also Read

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

जितेंद्र आव्हाडांचं ‘प्रत्युत्तर’, म्हणाले – ‘फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं’

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

Related Posts