IMPIMP

वेगवेगळया विचारसरणींच्या पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारांबाबत इतिहास काय सांगतो ? जाणून घ्या

by pranjalishirish
what history says does a government of different ideological parties last long

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रात शिवसेना Shiv Sena , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांना Parties एकत्र करुन महाविकास आघाडीची स्थापन केली. या तीन पक्षांनी राज्यात सरकार स्थापन केले. सत्ता स्थापनेला दीड वर्षे पूर्ण झाली. यामागचा हेतू एकच होता तो म्हणजे भाजपला सत्तेत येऊ देयचे नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या इराद्याने शरद पवार यांनी या तीन पक्षांना एकत्र आणले. महाराष्ट्रात असा पहिला प्रयोग शरद पवार यांनीच 1978 मध्ये केला होता. दरम्यान, सरकारच्या दीड वर्षाच्या काळामध्ये भाजपने सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडण्याची एकही संधी हुकवली नाही. वेगेवगेळ्या मुद्यांवरुन सरकारला घेण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. सध्याच्या चालू घडामोडीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अधिकच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत.

Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त येऊ शकतात अडचणीत

राज्यात वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांनी Parties एकत्र येऊन सरकार स्थापन केले असले तरी त्यांच्यामध्ये मतभेद आहेत. याचाच फायदा भाजपने घेत मागच्या दीड वर्षात सरकारच्या प्रत्येक चुकांवर बोट ठेवून त्यांच्यावर आरोप करण्याची संधी सोडलेली नाही. याच दरम्यान, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी सापडली. ही गाडी पार्क केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे (CIU) तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक झाली. त्यातच या प्रकरणातील गाडी मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला.

 

या प्रकरणावर विरोधक आक्रमक झाले असतानाच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब सोडून गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. आगोदरच आक्रमक झालेल्या भाजपने आणखी आक्रमक भूमिका घेत थेट गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आणि सरकारला खिंडीत पकडले. तर भाजप प्रमाणेच इतर विरोधी पक्षांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी लावून धरली. यावरून असा प्रश्न पडतो की, वेगेवेगळ्या विचार सरणींच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवलेलं सरकार टिकतं का ?

इतिहास काय सांगतो ?

राज्यात वेगवेगळ्या विचार सरणींच्या पक्षांनी Parties एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची ही देशातील पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील असे प्रयोग देशात झाले आहेत. मात्र, ही सरकारं अधिक काळ टिकलेली नाहीत. त्यामुळे सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार किती काळ टिकेल हे येणारा काळच ठरवेल. यापूर्वी 1989 मध्ये केंद्रामध्ये व्ही.पी. सिंग यांचे सरकार आले. व्ह.पी. सिंग यांना डाव्या आणि उजव्या गटांचा पाठिंबा मिळाला होता. मात्र, त्या सरकारच्या काळात राम मंदिर उभारणीसाठी काढलेल्या रथयात्रेदरम्यान लालकृष्ण अडवाणी यांना अटक झाली. तेव्हा इतर पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने व्ही.पी. सिंग सरकार कोसळलं. त्यानंतर अणू करारावरुन डाव्या पक्षांनी काँग्रेसचा पाठिंबा काढल्याने काँग्रेसचे देखील सरकार कोसळलं.

परमबीर सिंग, गृहमंत्री देशमुख यांच्यातील वाद उच्च न्यायालयात, 30 मार्चला सुनावणी

महाराष्ट्रातला पहिला प्रयोग 1978 मध्ये

वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांना एकत्र करुन सरकार स्थापनेचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग 18 जुलै 1978 रोजी झाला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार स्थापन झाले. यामध्येही शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता. शरद पवार यांचा समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिष्ट या पक्षांचा सरकारमध्ये समावेश होता. या आघाडीला नाव देण्यात आले पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच ‘पुलोद’. हे देखील सरकार फारकाळ टिकले नाही. शरद पवारांनी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांना एकत्र आणून पुलोदची स्थापन केली. शरद पवारांनी राजकीय खेळी करत वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 1978 च्या जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशन सुरु असताना शरद पवार यांनी 40 आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्यावर पाठित खंजीर खुपसल्याची टीका देखील झाली होती.

असे फक्त महाराष्ट्रातच घडले नाही तर काश्मीरमध्ये ही घडले आहे. काश्मिरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीने भाजपसोबत युती करुन काश्मिरमध्ये सरकार स्थापन केले. या दोन्ही पक्षांची विचारसरणी वेगवेगळी असली तरी सत्तेत राहण्यासाठी या पक्षांनी हातमिळवणी केली. पण हे सरकार अधिक काळ टिकू शकले नाही. त्यामुळे वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांनी Parties एकत्र येऊन स्थापन केलेली सरकारं अधिक काळ टिकत नसल्याचे दिसून येते. याला अपवाद म्हणजे नरसिंह राव यांचे सरकार. नरसिंह राव यांनी वेगवेगळ्या विचारसरणीच्या लहान-लहान पक्षांना एकत्र करुन सरकार स्थापन केले. त्यांनी हे सरकार 5 वर्षे चालवले.

‘सत्य जरा जास्त टोचतं’ अमृता फडणवीसांवर भाई जगतापांचा पलटवार

असे सरकार स्थापन करण्यामागचा हेतू काय ?

एखादा पक्ष दीर्घकाळ सत्तेत असल्यास आणि निवडणुकीत संख्याबळ कमी झाल्यावर विरोधात बसण्याची भिती निर्माण झाली की, असे पर्याय समोर येतात. याचे उदाहरण महाराष्ट्रात आहे. विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना Shiv Sena -भाजपमध्ये काही मुद्यांवरुन मतभेद झाले. याचा फायदा शरद पवार यांनी घेतला. त्यांनी पुढाकर घेऊन तीन पक्षांना एकत्र करुन सरकार स्थापन केले आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. तीन पक्षांचे सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्यात ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या संपूर्ण देशाने पाहिल्या.

वेगवेगळ्या पक्षांना एकत्र करुन स्थापन केलेले सरकार म्हणजे सत्तेच्या बेरजेचे राजकारण असते. उत्तर प्रदेशात भाजप-बहुजन समाज पक्षाने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. सरकार स्थापन करण्यापूर्वी बसपने भापवर मनुवादी अशी टीका केली. मात्र, सत्तेत येणार असल्याने या दोन्ही पक्षांनी हातमिळवणी करुन सरकार स्थापन केले. सत्तेत आल्यानंतर वैयक्तिक लाभ होतात, हा या मागचा हेतू असतो. तर समर्थक वर्गाचे देखील थोडेफार भले करता येईल, असा दूसरा हेतू यामागचा असतो.

West Bengal Election 2021 : PM नरेंद्र मोदींनी ‘त्या’ भाजप कार्यकर्त्याचे पायच धरले !, पहा व्हिडीओ

याच धर्तीवर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यापूर्वी कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करण्यात आला. परंतु वेगवेगळ्या विचारांच्या तीन पक्षांचे अजेंडे वेगवेगळे आहेत, त्यांची विचारसरणी वेगळी आहे. पण कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजे वीज, पाणी शेतकरी असे धोरण असेल तर सरकार चालते. पण या धोरणांचा विचार न करता मतभेद निर्माण होत असतील, आणि तीन पक्ष स्वत:च्या पक्षाचा Parties विचार करुन राजकारण करत असतील. तर सरकारला यामुळे धोका पोहचू शकतो.

Also Read : 

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

जाणून घ्या बीट ज्यूस पिण्याचे फायदे, विसरण्याचा आजार होईल दूर अन् इतरही फायदे

मग काय कॅन्सरच्या उपचारामध्ये केमोथेरपी नाही पुर्णपणे ‘प्रभावी’, झाला धक्कादायक खुलासा

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

जाणून घ्या बीट ज्यूस पिण्याचे फायदे, विसरण्याचा आजार होईल दूर अन् इतरही फायदे

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

Related Posts