IMPIMP

Anti Corruption Pimpri Chinchwad | 9 लाखाचे लाचेचे प्रकरण ! पिंपरी-चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau Pune | Two clerks of Pimpri Chinchwad Municipal Corporation caught by anti-corruption pune while takeing bribe

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Pimpri Chinchwad |  9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri Chinchwad Corporation) पुण्याच्या लाचालुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Anti Corruption) मोठी कारवाई करण्यात आली असून स्टॅंडीग कमीटी चेअरमन – नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लांडगे यांच्यासह त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुणे अ‍ॅन्टी करप्शनचे अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode) आणि अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP suhas nadgouda)यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या कारवाई सुरू असल्याचं सांगितलं आहे. मात्र, पुणे अ‍ॅन्टी करप्शनने 9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) मोठी कारवाई केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. 9 लाखाचे लाच प्रकरण असल्याने आणि थेट मोठा मासा गळाला लागल्याने पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात (Pune) प्रचंड खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे. अ‍ॅन्टी करप्शनचे पथक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ठाण मांडून बसले आहे. कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे या लिपिकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. 9 लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. 2 लाख रूपये पीए मार्फत स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्टँडींग कमीटीचे चेअरमन नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे, मनपा मधील लिपीक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती अ‍ॅन्टी करप्शनकडून देण्यात आली आहे.

स्टॅंडीग कमीटी चेअरमन – नितीन ज्ञानेश्वर लांडगे
PA – ज्ञानेश्वर पिंगळे
क्लार्क = अरविंद कांबळे
राजेंद्र शिंदे
मागणी – नऊ लाख
स्विकारले – दोन लाख( PA)
टेंडर मंजुर झाले , वर्क ऑर्डर काढणे करीता

 

Web Title : Anti Corruption Pimpri Chinchwad | 9 lakh bribery case! Pimpri-Chinchwad Municipal Corporation Standing Committee Chairman Adv. Nitin Landage in the net of anti-corruption pune

 

हे देखील वाचा :

Gold Rate Today | विक्रमी स्तरापासून 8,700 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, खरेदीची हीच संधी! जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | पुण्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफरला बाणेर टेकडीवर लुबाडले, 2 जणांवर FIR

Related Posts