IMPIMP

API And Two Lady Cops Suspended In Pune | पुणे: सहाय्यक पोलिस निरीक्षकासह (API) दामिनी पथकातील 2 महिला पोलिस तडकाफडकी निलंबीत

by sachinsitapure
Police Suspended

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – API And Two Lady Cops Suspended In Pune | हडपसर पोलिस स्टेशनच्या (Hadapsar Police Station) अंकित असणार्‍या मगरपट्टा सिटी पोलिस चौकीत (Magarpatta City Police Chowki) एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह (Assistant Police Inspector (API) Suspended In Pune) दामिनी पथकातील (Damini Squad Pune) दोन महिला पोलिसांना तडकाफडकी निलंबीत (Two Lady Police Suspended) करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त आर. राजा (IPS R Raja) यांनी दिले आहेत.

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद दोरकर, महिला पोलिस अंमलदार उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर पोलिस ठाण्यात दि. 1 फेबु्रवारी 2024 रोजी भादंवि 380 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्हयातील फिर्यादीने संशय व्यक्त केल्यामुळे त्यांच्या घरात काम करणार्‍या महिलेला दि. 9 फेब्रुवारी 2024 रोजी हडपसर पोलिसांनी सीआरपीसी 160 प्रमाणे नोटीस देऊन मगरपट्टा पोलिस चौकीत चौकशीकामी बोलाविण्यात आले होते.

महिला पोलिसांच्या समक्ष चौकशी केल्यानंतर संबंधित महिलेस पुन्हा सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा हजर राहण्याची समज देवुन त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आपल्याला गुन्हयामध्ये अटक होऊ शकते या भीतीमुळे संबंधित महिलेने नातेवाईकांसह मगरपट्टा पोलिस चौकीत येवुन गोंधळ घालण्यास सुरूवात केली. पोलिसांनी आपल्याला मारहाण केली असा आरोपी देखील संबंधित महिलेने केला. दरम्यान, प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

त्याची दखल घेवून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या सूचनाप्रमाणे संबंधित महिलेच्या आरोपाच्या तक्रारीवरून चौकशी सुरू करण्यात आली.
दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद दोरकर, दामिनी पथकातील पोलिस अंमलदार उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले यांना निलंबीत करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय्य चौकशी सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले आहे.

महिला पोलिस कर्मचार्‍यांवर अन्याय झाल्याची भावना

दामिनी पथकातील उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले यांना काही दिवसांपुर्वी उत्तम कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले होते. त्यांचा सत्कार देखील करण्यात आला होता. केवळ संशयित महिला असल्यामुळे महिला पोलिस सोनकांबळे आणि उदमले या मगरपट्टा चौकीत गेल्या होत्या. त्यांनी संबंधित महिलेला हात देखील लावला नसल्याची चर्चा सध्या पोलिस दलामध्ये आहे. दामिनी पथकातील महिला पोलिस कर्मचार्‍यांवर अन्याय झाल्याची भावना काही जणांनी बोलून दाखविली आहे.

Related Posts